Irrigation Department Engineer : स्वेच्छेने पैसे दिले तर स्वीकारतो!; जलसंपदा विभागाच्या इंजिनियरच अजब वक्तव्य, सरकारकडून तातडीने केली कारवाई

Government Engineer Controversy : जलसंपदा विभागाच्या अभियंत्याने स्वेच्छेने पैसे दिले तर स्वीकारतो, असे वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्याची दखल घेत सरकारने संबंधित अभियंत्यावर तातडीने कारवाई केली आहे.
Government Engineer Controversy Irrigation Department

Government Engineer Controversy Irrigation Department

esakal

Updated on: 

Engineer Corruption Case : कंत्राटदारांनी स्वतःच्या इच्छेने पैसे दिले तर आम्ही स्वीकारतो, मात्र कोणाकडे पैशांची मागणी करत नाही, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या मध्य प्रदेशातील जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला सरकारने निलंबित केले आहे. सी. बी. अहीरवार असे त्यांचे नाव असून, त्यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...