पाणीटंचाईची तीव्रता वाढतेय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

सद्यःस्थितीत राज्यात १ हजार २६२ टॅंकर सुरू
सोलापूर - यंदा पावसाअभावी खरीप आणि आता रब्बीचा हंगाम पूर्णपणे वाया गेला असून पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. २० डिसेंबरपर्यंत राज्यातील अकराशे गावांमध्ये आणि दोन हजार ३२९ वाड्या-वस्त्यांवर एक हजार २६२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

धरणांमधील झपाट्याने खालावणारी पाणीपातळी आणि लोकांची मागणी पाहता एप्रिल-मे महिन्यांत चारा व पाणीटंचाईची शक्‍यता व्यक्‍त होत आहे. राज्यातील १३१ तालुक्‍यांत गंभीर तर २९ तालुक्‍यांसह अन्य महसूल मंडळांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पाण्याअभावी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून शासनाने अनुदानाच्या स्वरुपात चारा लागवडीचे नियोजन केले आहे. मात्र, पाणीटंचाईमुळे चाऱ्याची लागवड करणे कठीण झाले आहे. दुसरीकडे लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही मोठा गंभीर होत असल्याचे चित्र दुष्काळी तालुक्‍यांमध्ये पहायला मिळत आहे. 

आतापर्यंत टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी २५ ते २८ कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे मदत व पुनर्वसन विभागाकडून सांगण्यात आले. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्र व राज्य सरकारकडून दुष्काळाची मदत तत्काळ द्यावी, अशी मागणी वाढत आहे.

प्रसंगी लातूरला रेल्वेने पाणी
लातूर शहराला मे-जूनपर्यंत पुरेल इतके पाणी उपलब्ध असून, त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. मात्र लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाल्यास मुंबई अथवा पुण्यातून रेल्वेने पाणी नेण्याचे नियोजन आहे. अन्य शहर-जिल्ह्यांमधील मागणीनुसार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती मंत्रालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र कुमटगी यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Shortage Increase