
सोलापूर : महाराष्ट्रात एकीकडे कोरोना व्हायरसशी लढा सुरु असताना दुसरीकडे सर्व सामान्य नागरिकांचा मात्र, पाणी टंचाईशी सामना सुरु आहे. राज्यात सरकारच्या आकडेवारीनुसार ६१० गावे आणि एक हजार १४२ वाड्यांवर पाणी टंचाई आहे. वास्तव चित्र मात्र यापेक्षा वेगळेच आहे. सरकारकडून टंचाई असलेल्या गावांमध्ये ५९७ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. काही गावांमध्ये कोरोनाच्या भितीममुळे टँकरचा प्रस्ताव देखील पाठवलेला नसुन ‘तोंड दाबून बुक्याचा मार’ या म्हणीप्रमाणे पाण्यासाठी भटकंती सुरु आहे.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोना व्हायरसने सध्या संपूर्ण जग कवेत घेतले आहे. याचा परिणाम सर्व घटकांवर झाला आहे. त्याला रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्रात दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते. गेल्यावर्षी तर पाऊसच न पडल्याने दुष्काळ पडला होता. त्यामुळे गावागावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती. अनेक गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरु होता. यार्षी सुद्धा पावसाळच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी पाऊस झाला नव्हता. मात्र, पावसाळ्याच्या शेवटी पाऊस पडला आणि काही प्रमाणात ओढे, नदी, तलाव, धरणात पाणी आले. त्यामुळे गावाचे सार्वजनिक स्त्रोतांमध्ये पाणी आले. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच त्या पाण्याने तळ गाठला आणि पाणी टंचाई निर्माण झाली. त्यानंतर मार्चमध्ये कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात प्रवेश केला आणि त्याचे रुग्ण दिवसांदिवस वाढत गेले. त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला. जसे रुग्ण वाढत गेले तसे ग्रामीण भागात भितीचे वातावरणही निर्माण झाले. त्यामुळे आहे तसंच नागरिक राहू लागले. सरकारने सामाजिक अंतर राखण्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत नागरिकांनी पाणी टंचाईच्या काळात सुद्धा अनेक ठिकाणी टँकरची मागणी केली नाही. काही गावात तर टँकरची मागणी करुन सुद्धा ग्रामस्तरावरुन प्रस्ताव गेले नसल्याचे नागरिक सांगत आहेत. काही ठिकाणी ग्रामपंचायतींनी पाणी पुरवठ्यासाठी गावाशेजारील बोअर व विहीरी अधिग्रहन केल्या आहेत. मात्र आता त्याला पाणी कमी येऊ लागले आहे.
ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील मांगी व म्हसेवाडी तलाव कोरडे पडले आहेत. या तलावावर अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत. या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई आहे. असे असताना सुद्धा टँकर सुरु झालेले नाहीत. सोलापूर जिल्ह्यात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या आकडेवारीनुसार १८ मेपर्यंत फक्त ११ गावे आणि २० वाड्यांवरती ११ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. जिल्ह्यातील बिटरगाव (श्री) येथे तिव्र पाणी टंचाई असून येथे अधिग्रहण केलेल्या बोअरवर पाणी पुरवठा अवलंबून आहे. येथे फक्त एकाच नळाला पाणी येत असून त्यावरुन संपूर्ण गावाची तहान भागवली जात आहे. वाड्यावस्त्यांवर सुद्धा पाणी टंचाई जाणवत आहे. येथे एक हातपंप असून त्याचे पाणी पिण्या लायक नाही. जिल्ह्यात अशीच स्थिती अनेक गावांमध्ये आहे.
जिल्हा निहाय पाणी टंचाई असलेली गावे व टँकरची संख्या
ठाणे जिल्ह्यात ५७ गावे व १८१ वाड्यावर ४१ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. रायगड जिल्ह्यात ७४ गावे व २३९ वाड्यांवर ३३ टॅंकरने पाणी पुरवठा सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ४८ गावे व ८८ वाड्यांवर १४ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. पालघर जिल्ह्यात ३२ गावे व ९९ वाड्यांवर ३५ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात ४४ गावे व १३ वाड्यांवर २५ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. नंदुरबार जिल्ह्यात एका गावात एका टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यात ६६ गावांमध्ये २६६ वाड्यांवर ७६ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. पुणे जिल्ह्यात २४ गावे व १०७ वाड्यांवर ३३ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. सातारा जिल्ह्यात १२ गावे १७ वाड्यांवर १३ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. सांगली जिल्ह्यात ७ गावे ३६ वाड्यांवर सात टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. औरंगाबाद जिल्ह्यात १२३ गावे व २६ वाड्यांवर ११८ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. जालना जिल्ह्यात २६ गावे व १० वाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. बीड जिल्ह्यात ४६ गावे व ३४ वाड्यांवर ९७ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. नांदेड जिल्ह्यात दोन गावे व पाच वाड्यांवर सात टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आठ गावांमध्ये नऊ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. लातूर जिल्ह्यात दोन टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. अमरावती जिल्ह्यात ११ गावांमध्ये १२ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. वाशिम जिल्ह्यात एका गावात टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. बुलढाणा जिल्ह्यात पाच गावात चार टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. यवतमाळ जिल्ह्यात १२ गावात १२ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. नागपूर जिल्ह्यात पाच गावात ११ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.
या जिल्ह्यांमध्ये नाही एकही टँकर
महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपू भंडारा, गोंदिया, वर्धा, अकोला, हिंगोली, परभणी, कोल्हापूर, जळगाव, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये एकही टँकर सरु आहे. राज्य सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छा विभागाकडून साप्ताहिक टँकरचा अहवाल सादर केला जातो. यामध्ये मेच्या तिसऱ्या आठवड्यातील ही स्थिती आहे. २७ एप्रिलपर्यत राज्यात २२७ गावे आणि ४७७ वाड्यांवर २०२ टँकरने पाणी पुरवठा सुरु होता. मेच्या पहिल्या आठवड्यात टँकरची संख्या ३२० झाली होती. १८ मेपर्यंत ही संख्या ५९७ झाली आहे. या आठवड्यातील स्थिती यावर उपलब्ध नाही. मात्र ही संख्या नक्कीच वाढलेली असणार आहे.
ग्रामपंचायतीना दिले जाणार कार्ड
पावसाळा तोंडावर आल्यामुळे येणाऱ्या काळात कोरोनाशिवाय इतर साथ रोग होण्याची शक्यत आहे. त्यात पाण्यामुळे अनेक आजार निर्माण होतात. हे आजार होऊ नयेत म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. त्यातूनच आरोग्यमंत्री राजे टोपे यांनी हिवतापासाठी संवेशनशील जिल्ह्यांमध्ये कीटकनाशक फवारणी, पाणी गुणवत्तेसाठी राज्यात स्वच्छता सर्वेक्षणाला गती देण्याचे आवाहन केले आहे. या काळात रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन कोरोनाच्या त्रिस्तरीय रुग्णालयीन व्यवस्थेत आवश्यकतेनुसार खाटांची क्षमता वाढवण्यास सांगितले आहे. याबरोबर पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला हिरवे, पिवळे व लाल रंगाचे कार्ड दिले जाणार आहे. लाल व पिवळे कार्ड धारक ग्रामपंचायतीने शुद्ध पाणी मिळावे म्हणून पाण्याचा स्त्रोत असलेल्या विहीरीत ब्लिंचींग पावडर वापरण्याची सूचना केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.