राष्ट्रवादी पर्यायी सरकार बनविण्यास तयार, काँग्रेसच्या निर्णयाची वाट : मलिक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

पर्यायी सरकार निर्माण करणे ही आमची जबाबदारी आहे. भाजपने नकार दिल्यानंतर राष्ट्रवादीची बैठक घेण्यात आली होती. काँग्रेसला विचारूनच आम्ही निर्णय घेऊ. आम्ही दोन तास बैठकीत चर्चा केली. शरद पवार आज दिल्लीला जाणार नाही. ते मुंबईतच असणार आहे.

मुंबई : महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय पर्याय निर्माण होऊ शकत नाही. आमचा पक्ष पर्यायी सरकार बनविण्यास तयार आहोत. शिवसेनेशी आमची चर्चा सुरु आहे. त्यामुळे आज दुपारी चार वाजता काँग्रेसची बैठक पुन्हा होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने ठरविले आहे, की काँग्रेसचा निर्णय होईपर्यंत आम्ही निर्णय घेणार नाही. आम्ही आघाडीत निवडणूक लढविल्याने आम्ही एकत्र निर्णय घेणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना आज (ता. ११) सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला राज्यपालांना कळवावे लागणार आहे. चार वाजता होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व स्पष्ट होणार आहे.

शिवसेना 'एनडीए'तून बाहेर?; अरविंद सावंत यांचा राजीनामा

मलिक म्हणाले, की पर्यायी सरकार निर्माण करणे ही आमची जबाबदारी आहे. भाजपने नकार दिल्यानंतर राष्ट्रवादीची बैठक घेण्यात आली होती. काँग्रेसला विचारूनच आम्ही निर्णय घेऊ. आम्ही दोन तास बैठकीत चर्चा केली. शरद पवार आज दिल्लीला जाणार नाही. ते मुंबईतच असणार आहे. शिवसेना नेत्यांशी आमची यापूर्वीही चर्चा सुरु होती आणि पुढेही सुरु राहील.

रास्ते की परवाह करूँगा तो... : संजय राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We are waiting for Congress to take a decision. We fought elections together says NCP leader Nawab Malik