भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी 'एनआईए' अ‍ॅक्शन मोडमध्ये 

सागर दिलीपराव शेलार
Monday, 7 September 2020

भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी एनआईए (NIA) आपल्याला विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप कलकत्ता येथील 'आईआईएसआर'चे प्राध्यापक पार्थसारथी राॅय यांनी केला आहे.

पुणे : भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी एनआईए (NIA) आपल्याला विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप कलकत्ता येथील 'आईआईएसआर'चे प्राध्यापक पार्थसारथी राॅय यांनी केला आहे. त्यांना 'एनआईए'ने 10 सप्टेंबरला चौकशीसाठी मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. पार्थसारथी राॅय यांनी 'एनआईए'वर गंभीर आरोप केले आहेत.

बाउन्सरचा 'डोस'; रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये दहशत

मिळालेल्या माहितीनुसार, राॅय म्हणाले, भीमा कोरेगाव दंगलीशी आपला कसलाही संबंध नाही. मी केव्हाही कोरेगावला गेलो नाही. राॅय यांनी स्पष्टपणे आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी आपला दंगलीशी काडीमात्रही संबंध नसल्याचे सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राॅय पुढे म्हणाले की, आपल्याला जे समन्स बजावले आहे ते सीआरपीसीच्या कलम 160 नुसार आणि ते देखील कोणी साक्षीदार न घेता दिले आहे. मला याबाबत काहीच माहिती नव्हती. मला देखील न्यूझव्दारेच या गोष्टींची माहिती मिळाली.

राॅय यांनी एनआईए (NIA) आपल्याला विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप करत म्हणाले की, हा समन्स मला भीती दाखविण्यासाठी पाठविला आहे. इतर बुद्धिजीवी लोकांना त्रास दिला जात आहे, तसाच मला देखील दिला जात आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सामिल असताना आपल्याला जाणीवपुर्वक टारगेट केले जात आहे.

काय झाले होते कोरेगावात...
1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव या गावात विजयस्तंभ येथे कार्यक्रम होणार होता, या ठिकाणी कार्यक्रमावेळी दंगल झाली. यावेळी झालेल्या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या दंगलीबाबत एनआईए तपास करत आहे. या दंगलीप्रकरणी एनआईएने अनेक बुद्धिजीवी लोकांना अटक केली आहे. आता सध्या 'एनआईए'ने  राॅय यांच्यासहीत 9 जणांना समन्स पाठवून मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणयाचे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We have nothing to do with Bhima Koregaon riots says partho sarathi