रामदास आठवले म्हणतात, 'दलित शब्द पाहिजेच'

प्रशांत बारसिंग
Thursday, 19 September 2019

शासकीय कामकाजात दलित शब्द वापरण्याचे आदेश राज्य सरकारने काढले असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यवहारात मात्र दलित शब्द पाहीजेच, असे मत व्यक्‍त केले.

मुंबई : शासकीय कामकाजात दलित शब्द वापरण्याचे आदेश राज्य सरकारने काढले असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यवहारात मात्र दलित शब्द पाहिजेच, असे मत व्यक्‍त केले.

बांद्रा येथील त्यांच्या 'संविधान' बंगल्यात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. ते म्हणाले, की शासकीय नोंदीमध्ये जातीचा उल्लेख करताना दलित हा शब्द यापूर्वीही वापरला जात नव्हता. त्यामुळे शासकीय नोंदीमध्ये दलित शब्दाला मनाई ठीक आहे. परंतु व्यवहारात तसेच प्रसार माध्यमांमध्ये दलित शब्दाला मनाई करता कामा नये. दलित शब्दच शेकडो वर्षांपासून आलेल्या सामाजिक विषमतेच्या वेदनेला नेमकेपणाने प्रकट करतो. त्यामुळेच भारतीय दलित पॅंथर या संघटनेची आम्ही स्थापना केली होती. माझ्या मते दलित शब्द व्यवहारात असायलाच हवा, असे मत आठवले यांनी व्यक्‍त केले. 

आता दलित शब्द होणार हद्दपार!

राज्य शासनाने सरकारी कागदपत्रांतून दलित शब्द वापरण्यास मनाई करणारा आदेश काढला आहे. याबाबत आठवले यांनी प्रतिक्रिया देताना व्यवहारात दलित शब्द असायलाच हवा अशी भूमिका मांडली आहे.

डॉ. मनमोहनसिंगांची होती पाकिस्तानवर हल्ल्याची तयारी; कोणी केला गौप्यस्फोट

बोलणे,भाषण करणे आणि मीडिया माध्यमांमध्ये दलित शब्द वापरण्यास मनाई करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे व्यवहारात दलित शब्द असायलाच हवा, सरकारी दस्ताऐवजांमध्ये यापूर्वीपासून अनुसूचित जाती हा शब्दप्रयोग केला जात असल्याचे सांगत व्यवहारात दलित शब्दाला मनाई नसावी असे स्पष्ट मत आठवले यांनी व्यक्त केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We wants Dalit word says Ramdas Athawale