Vidhan Sabha 2019 : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून चिंतामुक्त करणार : उद्धव ठाकरे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

- आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर शिवआरोग्य योजना मी देणार.

नारायणगाव : आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर शिवआरोग्य योजना मी देणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून चिंतामुक्त करणार असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तसेच चहूबाजूंनी विचित्र संकट घोंगवत आहे. त्यामुळे मी युती केली. मी भाजपसोबत गेलो, असेही ते म्हणाले.

नारायणगाव येथे आयोजित जाहीरसभेत उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, सत्तेच्या आसपास पोहचत नसल्याने विरोधकांकडून काहीही बोलले जात आहे. आम्ही चांगल्या योजना आणतोय तर तुम्ही आडवे का येत आहात, असा सवालही त्यांनी यावेळी केला. सरकारच्या अनेक योजनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो जरी असला तरी त्यामध्ये सिंहाचा वाटा हा शिवसेनेचा आहे. 10 रुपये जेवण आणि 1 रुपयात आरोग्य तपासणी ही करणार असा निर्धारही त्यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला पुन्हा अपघात; मोठा अनर्थ टळला

शिवनेरी गडावर येणार

निवडणुका संपताच मी वाजत-गाजत शिवनेरी गडावर येणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

फक्त टीका करण्यासाठी निवडणूक नाही

ही निवडणूक फक्त टीका करण्यासाठी नाही. विरोधक काहीतरी बोलणार त्याला प्रत्युत्तर देणार मग ते त्यावर काहीतरी बोलणार. यासाठी ही निवडणूक लढत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We will Debt free to farmers says Uddhav Thackeray Maharashtra Vidhan Sabha