'चर्चा करून पुढची रणनिती ठरविणार'; अशोक चव्हाण यांचे सूचक वक्तव्य

वृत्तसंस्था
Friday, 25 October 2019

कलम 370 चा फायदा भाजपला नाही 

चर्चा करून पुढची रणनिती ठरविणार

मुंबई : मतदान प्रक्रिया संपल्यानंतर घेतल्या जाणाऱ्या एक्झिट पोलवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी टीका केली. एक्झिट पोल हा एक धंदा झाला आहे. एक्झिट पोल हे चुकीच्या पद्धतीने ठरवून दिले जात आहेत, असे ते म्हणाले. तसेच चर्चा करून पुढची रणनिती ठरविणार आहे, असेही ते म्हणाले.

भोकरमधील जागा पडल्यात जमा आहे. अशोक चव्हाण पडणार असे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात 97 हजार मताधिक्याने भोकरची जागा निवडून आली आहे. त्यामुळे एक्झिट पोल धंदा झाल्याचं परखड मत चव्हाण यांनी व्यक्त केले. 

कलम 370 चा फायदा भाजपला नाही 

भाजपने निवडणुकीत प्रचारासाठी 370 कलमचा वापर केला. याचा त्यांना फायदा झाला नाही. 370 ऐवजी महाराष्ट्राला अनुषेश दूर करण्यासाठी 371/2 ची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.  

चर्चा करून पुढची रणनिती ठरविणार

आघाडीच्या सत्तास्थापनेबाबत काही हालचाली सुरू आहेत का?, असा सवाल पत्रकारांनी अशोक चव्हाण यांना विचारला. त्यावर अशोक चव्हाण म्हणाले, आज मी मुंबईला जात आहे. सहकाऱ्यांशी चर्चा करुन पुढील रणनिती ठरविणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We will decide next Political strategy says Ashok Chavan