
"आमचा विजय नक्की होणार"; राज्यपालांच्या भेटीनंतर क्रांतीला विश्वास
मुंबई : आर्यन खान प्रकरणामुळं अडचणीत आलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आपल्या कुटुंबियांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. "आमचा विजय नक्की आहे" असा विश्वास क्रांतीनं व्यक्त केला.
हेही वाचा: समीर वानखेडे कुटुंबासह राज्यपालांच्या भेटीला
क्रांती म्हणाल्या, "आम्ही आता राज्यपालांना निवेदन दिलं आहे. आमच्यासोबत जे होत आहे ते सर्वकाही आम्ही राज्यपालांनी सांगितलं. आमची काही खूप मोठी तक्रार नाही पण सत्याची लढाई आहे. आम्ही आमचं रडणाणं गायला राज्यपालांकडे गेलो नव्हतो. आम्हाला ताकदीचं गरज आहे आणि राज्यपालांनी आम्हाला याबाबत आश्वासित केलं आहे. गरीब बिचारे सारखे इकडून तिकडे फिरत आहेत, अस जर कोणाला वाटतं असेल तर हे तसं नाही, आम्ही योद्धा आहोत. त्यामुळे आम्ही यापुढेही असेच लढत राहू"
हेही वाचा: Bmc Election: काँग्रेसकडून इच्छुक महिला उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आम्हाला लढायला आणखी बळ मिळालं असून न्यायही नक्कीच मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. आमच्या कुटुंबियांना टोमणे मारले जात आहेत. कुठलेही खोटे पुरावे दाखवून आमच्या अब्रूवर हल्ले केले जात आहेत, हेच आम्ही राज्यपालांना सांगितलं आहे, असंही क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे.
Web Title: We Will Definitely Win Kranti Redkar Expressed Confidence After Governor Visit
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..