राज्यात रविवारपासून थंडीचा कडाका वाढणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

पुढील दोन दिवसांत वातावरण कोरडे राहण्याची शक्‍यता असून, रविवार (ता. ८) पासून पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे - अरबी समुद्रात असलेल्या ‘पवन’ चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही कोकण व दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागांत आहे. मात्र, मुंबईजवळ असलेल्या चक्रावाताची स्थिती निवळत असल्याने ढगाळ वातावरणाची तीव्रता कमी होत आहे. पुढील दोन दिवसांत वातावरण कोरडे राहण्याची शक्‍यता असून, रविवार (ता. ८) पासून पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ढगाळ हवामानामुळे काही ठिकाणी हलक्‍या पावसाच्या सरीही पडल्या. अरबी समुद्रात सध्या घोंघावणाऱ्या ‘पवन’ चक्रीवादळाचा प्रवास दक्षिण-पश्‍चिमेला सोमालियाच्या दिशेने होणार आहे. पुढील १२ तासांनंतर याचा प्रभाव कमी होत जाईल. नंतर त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होणार आहे. यंदा उत्तर हिंदी महासागरामध्ये अकरा चक्रावात (सायक्‍लॉनिक डिसटर्बन्स) निर्माण झाले होते. त्यातील चार बंगालच्या उपसागरात तर सात अरबी समुद्रात निर्माण झाले होते. त्यांचे आठ चक्रीवादळात रूपांतर झाले होते, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The weather forecast predicted a cold wave to begin Sunday