IMD cyclone warning for Andhra Pradesh
esakal
अमरावती : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णव’ चक्रीवादळाचे आज अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर (Arnava cyclone landfall in Andhra Pradesh) झाले. हे चक्रीवादळ आज (ता.२८) यनमजवळ बापटला आणि विशाखापट्टणमदरम्यान आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी १२५ ते १३५ कि.मी.दरम्यान राहण्याचा अंदाज असून तो १५०कि.मी. प्रतितासपर्यंतही पोचू शकतो, अशी माहिती हवामान खात्याच्या (आयएमडी)भुवनेश्वर विभागाच्या संचालक मनोरमा मोहंती यांनी दिली.