
मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेशात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात गारपीट होऊ शकते. वादळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा कमी झाला आहे.