esakal | राज्यात विजांसह पावसाची शक्यता; ८ जिल्ह्यात यलो अलर्ट | Maharashtra Rain
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

अरबी समद्रात तीव्र होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे गुरुवारी (ता. ३०) उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता आहे.

राज्यात विजांसह पावसाची शक्यता; ८ जिल्ह्यात यलो अलर्ट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - गुलाब चक्रीवादळाची प्रणाली गुजरातकडे सरकून गेल्याने राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात येत्या गुरुवारी (ता. ३०) तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, पूर्व विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने बुधवारी वर्तविली आहे.

दक्षिण गुजरात आणि खंबातच्या आखातामध्ये ठळक कमी दाबाचे क्षेत्र आहे. पश्चिमेकडे सरकत असलेली ही प्रणाली आज आणखी तीव्र होणार आहे. पश्चिम बंगाल आणि परिसरावरही हवेचे ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दोन्ही प्रणालींच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. अरबी समद्रात तीव्र होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे गुरुवारी (ता. ३०) उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हेही वाचा: अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यातील खरीप हंगाम गेला पाण्यात

पुणे शहरात येत्या गुरुवारी (ता. ३०) आणि शुक्रवारी (ता. १) या दोन दिवशी आकाश अंशतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी पडतील, अशी २५ ते ५० टक्के शक्यता आहे, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. त्यानंतर पुढील दोन दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवारी घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढेल.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

कोकण : पालघर

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

विदर्भ : भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

इतर महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, नाशिक.

loading image
go to top