
पुणे: वादळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा कमी झाला आहे. शुक्रवारी मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. पुणे शहरामध्ये गेल्या आठवड्याभरात कमाल तापमानात तब्बल सात अंश सेल्सिअसची घट झाली आहे.