पुणे : राज्यातील अनेक भागांत जोरदार मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे. यातच वादळी वाऱ्याचीही भर पडल्याने अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र शुक्रवारी दिसले. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. पावसाचा असाच जोर शनिवारीही कायम राहण्याची शक्यता असल्याने काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.