
पुणे : गेल्या आठवड्याभरापासून राज्यात हजेरी लावलेला पूर्वमोसमी पाऊस आणखी पाच ते सहा दिवस पडण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्याभरात राज्यातील कमाल तापमानात मोठा बदल होणार नसल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. शुक्रवारीही राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.