Wed, March 29, 2023

Weather Update : पुढचे चार दिवस पावसाचे; कुठे, कधी पडणार पाऊस? जाणून घ्या एका क्लिकवर
Weather Update : पुढचे चार दिवस पावसाचे; कुठे, कधी पडणार पाऊस? जाणून घ्या एका क्लिकवर
Published on : 4 March 2023, 10:47 am
मार्च हा उन्हाळ्याचा महिना. मात्र यंदा उन्हाळ्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. पुढचे काही दिवस सर्वांनीच काळजी घेणं गरजेचं आहे.
राज्यामध्ये पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढचे तीन ते चार दिवस पावसाचे असणार आहेत. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ४ ते ७ मार्च या कालावधीमध्ये विजांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये वातावरण ढगाळ राहील.
नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, जालना या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यंदाच्या वर्षी भारतातल्या मान्सूनला अल निनोचा धोका आहे. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.