.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कोकणसह घाटमाथ्यावर गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पुणे, मुंबईला बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसानं झोडपलं. पुण्यात काही भागात पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झालीय. तर काही ठिकाणी घरात पाणी घुसलं आहे. दरम्यान, येत्या २४ तासात कोकणसह मुंबई, पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा घाटमाथा परिसरात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.