Weather Update : राज्यात पावसाचा अलर्ट! मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा

Weather Update : राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या.
Weather Update
Weather Update Esakal

राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. अशातच आज मतदानाच्या दिवशी पावासाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज (सोमवारी) दुपारनंतर अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफानी पावसाची अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे, अहमदनगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. याशिवाय नंदुरबार, जळगाव आणि बीड जिल्ह्यातही तुफान पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यात गारपिटीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने पुणे, मावळ, शिरूर अहमदनगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Weather Update
मतदार यादीतून तुमचे नाव वगळले आहे का? 2 कागदपत्रांसह ‘येथे’ फार्म नंबर-6 भरा, 7 दिवसात समाविष्ठ होईल नाव; लोकसभेला मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी

नंदुरबार, जळगाव, रावेर आणि बीड जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी दुपारनंतर अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज आहे. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाची अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Weather Update
स्मार्ट सिटी सोलापुरातील पाण्याची भयानकता! 1.24 लाख कुटुंब इलेक्ट्रिक मोटारी लावूनच भरतात पाणी; शॉक लागून अनेकांचा मृत्यू, तरीपण परिस्थिती ‘जैसे थे’च

तर, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील उर्वरित इतर सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अशंतः ढगाळ आकाश राहणार असून संध्याकाळी किंवा रात्री हलक्या पावसाची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com