
Weather Update: राज्यातील 'या' भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावताना दिसुन येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या काही भागात पावसाचा जोर दिसुन आला. तर आजही काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील काही ठिकाणी तापमानात काही प्रमाणत घट झाली आहे तर काही ठिकाणी उष्णतेचा पारा चढल्याचं दिसुन येत आहे. तर, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशासह राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. काही भागात उष्णतेची लाट आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडुन वर्तवण्यात आला आहे. तर, राज्यातील काही शहरांचा कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांपर्यंत घसरला आहे. आता नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पावसाच्या हजेरीमुळे उकाडा थोडा कमी होऊन हवेतील गारवा वाढेल. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसानही झालं आहे.