Satara Crime : जेवण न दिल्यामुळं दारुड्या भाच्यानं घोटला वृद्ध आत्याचा गळा; दांडक्यानंही केली बेदम मारहाण

संशयित हरिदास याच्या आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तो त्याची आत्या वत्सला यांच्याकडे राहात होता.
Satara Police Crime News
Satara Police Crime Newsesakal
Summary

या प्रकाराची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी संशयित आरोपीच्या शोधासाठी दोन पथक तयार केली.

सातारा : जेवण दिले नाही म्हणून वृद्ध आत्याचा भाच्यानेच निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना बसाप्पाचीवाडी (ता. सातारा) येथे सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

वत्सला नामदेव बाबर (वय ७०) असे तिचे नाव आहे, तर हरिदास सुरेश चव्हाण (वय ३०, रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) असे अटक केलेल्या भाच्याचे नाव आहे. संशयित हरिदास याच्या आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तो त्याची आत्या वत्सला यांच्याकडे राहात होता. त्याला दारूचे (Liquor) व्यसन होते.

सोमवारी रात्री हरिदासने आत्याला जेवण मागितले. मात्र, त्याला वेळेवर जेवण न दिल्याने त्याने वत्सला यांना दांडक्याने बेदम मारहाण केली. यामुळे जखमी झालेल्या आत्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारानंतर हरिदास हा तेथून पसार झाला. या प्रकाराची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी संशयित आरोपीच्या शोधासाठी दोन पथक तयार केली.

Satara Police Crime News
Jaysingpur : आंबेडकर पुतळ्याचा वाद विकोपाला; आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, 150 जणांवर गुन्हा

या दोन्ही पथकांनी अवघ्या दोन तासांत संशयिताला गावच्या परिसरातूनच अटक केली. त्याने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. आईवडिलांच्या निधनानंतर लहानचे मोठे केलेल्या भाच्यानेच अशाप्रकारे आत्याचा जीव घेतल्याने बसाप्पाचीवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Satara Police Crime News
Prithviraj Chavan : 'पंतप्रधान मोदींनी देश विकायला काढलाय, हे आता लोकांच्या लक्षात आलंय'

पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, हवालदार मालोजी चव्हाण, किरण जगताप, तुकाराम पवार, नीतिराज थोरात, नीलेश जाधव, रायसिंग घोरपडे, गजानन फडतरे यांनी कारवाईत भाग घेतला. सहायक पोलिस निरीक्षक अनिता आमंदे-मेणकर तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com