Weather Update : टीव्ही, रेडिओवरूनही मिळणार हवामानाचा इशारा; ‘एनडीएम’चा उपक्रम; नागरिकांना सावध करणार

देशातील नागरिकांसाठी अत्यंत प्रतिकूल हवामानाचा इशारा लवकरच टीव्ही तसेच रेडिओवरूनही देण्यात येणार
weather update Very adverse weather warning for citizens will given on TV radio
weather update Very adverse weather warning for citizens will given on TV radiosakal

नवी दिल्ली : देशातील नागरिकांसाठी अत्यंत प्रतिकूल हवामानाचा इशारा लवकरच टीव्ही तसेच रेडिओवरूनही देण्यात येणार आहे. टीव्हीच्या पडद्यावर हा इशारावजा संदेश झळकेल. रेडिओवरील कार्यक्रम मध्येच थांबवून हवामानाचा इशारा दिला जाईल.

weather update Very adverse weather warning for citizens will given on TV radio
Weather Update: राज्यातील 'या' भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) नुकतेच मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह कोसळणारा पाऊस आणि उष्णतेच्या लाटा आदींबद्दलची महत्त्वाची माहिती मोबाईलवर मेसेजच्या माध्यमातून पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर, आता पुढील पाऊल टाकत टीव्ही, रेडिओ आणि इतर माध्यमांवरून नागरिकांना खराब हवामानाबद्दलची माहिती पाठवून त्यासाठी सज्ज राहण्याचा सल्ला दिला जाईल.

‘एनडीएमए’च्या अधिकाऱ्याने सांगितले, की मोबाईलवरून नागरिकांना हवामानाच्या इशाऱ्याचे मेसेज पाठविणे हा पहिल्या टप्प्याचा भाग आहे. दुसऱ्या टप्प्यात टीव्ही, रेडिओ व इतर माध्यमांवरून नागरिकांना हवामानाचा इशारा पाठविला जाईल.

येत्या वर्षाच्या अखेरीस त्याची अंमलबजावणी होईल. तंत्रज्ञान व दळणवळणाच्या एकत्रीकरणामुळे मजकुरावर आधारित मर्यादा ओलांडण्याचे एनडीएमएचे उद्दिष्ट आहे. मोबाईलवर संदेश पाठविण्यापूर्वी ‘एनडीएमए’कडून नॅशनल डिझास्टर अलर्ट पोर्टलच्या माध्यमातून आणि ‘सचेत’ नावाच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून सावधगिरीचा इशारा दिला जात असे.

एनडीएमएने हवामान खात्यासह, केंद्रीय जल आयोग, भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र आणि भारतीय वन सर्वेक्षण, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आदी हवामानाचा इशारा जारी करणाऱ्या संस्थांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने एकात्मिक इशारा यंत्रणेची संकल्पना मांडली होती.

weather update Very adverse weather warning for citizens will given on TV radio
Weather Update : राज्यात पूर्वमोसमी पावसाला सुरुवात; पिकांचे नुकसान, वीज पडून पाच जणांचा मृत्यू

या प्रकल्पाची पहिल्या टप्प्यात २०२१ मध्ये तमिळनाडूत प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केल्यानंतर केंद्राने तो संपूर्ण देशात राबविण्यास संमती दिली होती. हा अशा प्रकारचा हवामानाचा इशारा देण्याचा जगातील सर्वांत मोठा उपक्रम आहे. त्यासाठी, लोकांना व्हाट्‌स ॲप, ई-मेल किंवा एसएमएस ग्रुपचे सदस्यत्व घेण्याची गरज नाही. त्यांना हवामानाचा इशारा आपोआप मिळेल, असेही एनडीएमएच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, असा इशारा मिळाल्यानंतर मोबाईलही व्हायब्रेट होईल. हे खूप कमी वेळात केले जाईल.

weather update Very adverse weather warning for citizens will given on TV radio
Weather Update: मान्सून दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात; महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

देशात ५० वर्षांत ५७३ आपत्ती

जागतिक हवामान संस्थेच्या माहितीनुसार १९७० ते २०२१ या ५० वर्षांच्या काळात भारताला हवामानाशी संबंधित सुमारे ५७३ आपत्तींचा सामना करावा लागला. या आपत्तींमध्ये १ लाख ३८ हजार ३७७ जणांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे, २०२२ मध्ये अशा आपत्तींमुळे २,७७० जणांना प्राण गमवावे लागले.

उपक्रमाची वैशिष्ट्ये

  • वामानाची सामान्य इशारा यंत्रणा उभारणारा भारत उत्तर गोलार्धाबाहेरचा एकमेव देश

  • मोबाईलवर इशाऱ्याचा मेसेजसाठी व्हॉट्‌स ॲप ग्रुपची गरज नाही

  • लोकांना स्थानिक भाषेसह दोन भाषांत हवामानाचा इशारा मिळणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com