

उत्तर भारतात शीत लहर सुरु असल्याने महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढला आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गारठा अधिक वाढत आहे. पुढील दोन दिवस वाऱ्यांच्या दिशेत बदल होण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम तापमानावर होऊ शकतो.आज राज्याच्या बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. थंडीचा जोर राज्याच्या अनेक भागांत कायम राहणार आहे असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.