‘दहावी नंतर करिअर फक्त 'कसे निवडावे' नव्हेतर 'कसे घडवावे' – प्रा. डॉ. नितीन कदम यांनी केले वेबिनारद्वारे मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

दहावी झाली की आयुष्याला कलटणी देणारी करिअरची अवघड वळण वाट सुरू होते. या वाटेवर मार्गदर्शन करण्यासाठी सकाळ व दिशा ॲकॅडमी वाई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दहावीनंतर काय?’ याविषयावर विनामुल्य वेबिनार रविवार दिनांक 21 जून रोजी घेण्यात आला. शंभर जणांनी या वेबिनारमध्ये सहभाग नोंदवला.

महाराष्ट्र: दहावी झाली की आयुष्याला कलटणी देणारी करिअरची अवघड वळण वाट सुरू होते. या वाटेवर मार्गदर्शन करण्यासाठी सकाळ व दिशा ॲकॅडमी वाई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दहावीनंतर काय?’ याविषयावर विनामुल्य वेबिनार रविवार दिनांक 21 जून रोजी घेण्यात आला. शंभर जणांनी या वेबिनारमध्ये सहभाग नोंदवला.

पालक व विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करतांना  प्रा. डॉ. नितीन कदम यांनी दहावीनंतर करिअरची निवड कशी करावी? Aptitude Test चे महत्व काय? इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर, डिफेन्स कोर्सच्या परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, कॉलेजेस व ब्रॅन्चेस बद्दल माहिती. या परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी महत्वाच्या बाबी कोणत्या? कोरोना व लॉकडाऊनचा या परीक्षांच्या तयारीवर काय परिणाम होऊ शकतो. ऑनलाईन तयारी कशी करावी? दिशा अकॅडमी, वाई येथे या परीक्षांची तयारी कशा प्रकारे केले जाते; या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. तसेच प्रश्नांची उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले. 
विविध स्पर्धा परीक्षांची सर्व्वोत्तम तयारी करून घेणारी वाईतील दिशा ॲकॅडमी सर्व अत्याधुनिक सोईसुविधा, उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक, मेस, होस्टेल, अभ्यासावर लक्ष केंद्रात करता येईल असे वातावरण यासाठी सुपरिचित आहेच. मात्र सध्याची परिस्थिती पहाता ऑनलाईन शिक्षणाचे काटोकोर नियोजन करून सोशल डिस्टन्सिंग, आरोग्य व सुरक्षेच्या सर्व मानदंडाचे पालन यावर दिशा ॲकॅडमीने भर दिला असल्याचे कदम सर यांनी अधोरेखित केले. दहावी नंतर मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, डिफेन्स या क्षेत्रात करिअर इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी अधिक माहिती हवी असल्यास नि:संकोचपणे दिशा ॲकॅडमीच्या  7775925923 / 7775024445 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही प्रा. डॉ. नितीन कदम यांनी आवर्जून सांगितले.

 

कोविड-19 चे संकट, लॉकडाऊन, ऑनलाईन शिक्षण, परीक्षा या सगळ्याबाबत संभ्रमावस्था असताना समाजाच्या बदलत्या गरजा आणि करिअरच्या संधी कोणत्या बाबत डॉ. कदम यांनी अगदी सोप्या शब्दात समजावून सांगितले. करिअर घडविताना पाल्याचे अंगीभूत गुण व क्षमतांचा विचार करणे गरजेचे आहे तसेच विविध क्षमता चाचण्याद्वारे करिअरची योग्य निवड करता येणे शक्य आहे ही उपयुक्त माहिती या वेबिनारद्वारे पालकांनी मिळवली. शास्त्रीयदृष्ट्या अधिक समृद्ध करिअर घडविण्याच्या दृष्टीने हा वेबिनार अतिशय मोलाचा ठरला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What after X'th , Free webinar