esakal | राज्यातील गुन्हेगारी विश्‍लेषणाचा अहवाल काय आहे?
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

२०१६च्या तुलनेत २०१७ मधील गुन्ह्यांची स्थिती

  • स्त्रियांवरील अत्याचारामध्ये २.३१ टक्‍क्‍यांनी वाढ
  • स्त्रियांवरील सर्वाधिक गुन्हे मुंबईमध्ये दाखल
  • दरोड्याच्या गुन्ह्यात ०.६१ टक्के घट
  • अनुसूचित जातीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात ३.६० टक्के घट
  • अनुसूचित जमातीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात १५.१४ टक्के वाढ
  • दोषसिद्धीचे प्रमाण ३२.४५ टक्के

राज्यातील गुन्हेगारी विश्‍लेषणाचा अहवाल काय आहे?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दोन वर्षांचा खंड; २०१७ मध्ये महिला अत्याचारांत वाढ
पुणे - राज्यातील गुन्हेगारीचे विश्‍लेषण करणाऱ्या ‘क्राइम इन महाराष्ट्र’च्या अहवाल दोन वर्षांच्या खंडानंतर अखेर गुरुवारी पोलिस आयुक्त कार्यालयामध्ये प्रकाशन करण्यात आला. ‘महाराष्ट्रातील गुन्हे : २०१७’ या वार्षिक आवृत्तीमध्ये राज्यातील गुन्ह्यांची वस्तुनिष्ठ सांख्यिकी, विवेचन, गुन्हेगारांच्या प्रवाहाचे शास्त्रोक्त विश्‍लेषण व गुन्ह्यांचे नवीन स्वरूप यांचा उल्लेख आहे. २०१६च्या तुलनेत २०१७ मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत २.३१ टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे या अहवालात नमूद केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या हस्ते या अहवालाचे प्रकाशन झाले. या वेळी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, पोलिस महानिरीक्षक (पश्‍चिम) प्रवीण साळुंके, राज्य गुन्हे अन्वेषण केंद्राचे पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय मंडलिक, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक जालिंदर सुपेकर, पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक आरती बनसोडे आदी उपस्थित होते.

राज्यातील तापमान वाढीमुळे विजेची विक्रमी मागणी

केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या वतीने दरवर्षी प्रकाशित केला जातो. हा अहवाल ऑक्‍टोबर २०१९ मध्ये प्रकाशित झाला. त्याच धर्तीवर राज्यातील ‘महाराष्ट्रातील गुन्हे’ हा गुन्हे विषयक अहवाल दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यामध्ये पोलिस कर्तव्य मेळाव्याच्या समारोपप्रसंगी केला जातो; परंतु मागील दोन वर्षांपासून हा अहवाल प्रसिद्ध केला नव्हता. गुरुवारी प्रसिद्ध झालेला अहवालही २०१७ मधील गुन्ह्यांबाबतचे विश्‍लेषण करणारा आहे. संबंधित अहवालामध्ये २०१७ मध्ये महाराष्ट्रात घडलेल्या गुन्ह्यांची वस्तुनिष्ठ सांख्यिकी, विवेचन व गुन्हेगारांच्या शास्त्रोक्त विश्‍लेषणाचा उल्लेख आहे. त्यानुसार राज्यात दोन लाख ८८ हजार ८७९ इतक्‍या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

देशातील भारतीय दंड विधानअंतर्गत दाखल गुन्ह्यांपैकी राज्यात ९.४३ टक्के गुन्हे दाखल झाले आहे. २०१६च्या तुलनेत २०१७ मध्ये गुन्ह्यात १०.३८ टक्के इतकी वाढ झाली आहे. राज्यातील एकूण गुन्ह्यांपैकी ३४.३७ टक्के गुन्हे राज्यातील सर्व पोलिस आयुक्तालयांमध्ये दाखल असून, त्यामध्ये सर्वाधिक गुन्हे मुंबईमध्ये दाखल आहेत.

loading image