Jalna OBC Sabha: 'ते 70 पोलीस काय पाय घसरून पडले का?', अंतरवलीतील लाठीचार्जवर काय म्हणाले छगन भुजबळ?

लाठीचार्ज प्रकरणावर काय म्हणाले छगन भुजबळ?
Jalna OBC Sabha
Jalna OBC SabhaEsakal
Updated on

जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसी समाजाची सभा होत आहे. सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांकडून अंबडमध्ये आरक्षण बचाव एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. या आयोजित परिषदेला मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर उपस्थित आहेत. यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबासीमधून आरक्षण देण्यावर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना झालेल्या लाठीचार्ज प्रकरणावर त्यांनी भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, 'उपोषण केलं. काय झालं पोलिसांचा लाठीचार्ज झाला. पोलिसांचा लाठीचार्ज सर्वांनी पाहिला. महिला पोलिसांसह ७० पोलिस रूग्णालयात अॅडमिट झाले. दगडांचा मार खाऊन जखमी झाले. पोलीस त्यांना उठवायला गेले तेव्हा ते म्हणाले, मी झोपलोय नंतर या ते पुन्हा येईपर्यंत त्यांनी सर्व तयारी करून ठेवली. तिथे महिला देखील होत्या त्यामुळे महिला पोलीस देखील तिथे आल्या होत्या.'  (Marathi Tajya Batmya)

Jalna OBC Sabha
Jalna OBC Sabha: "स्वकष्टाचे खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही"; छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल

'पोलिसांनी जशी विनंती केली चला, तुमची तब्येत खूप वाईट आहे. आता रूग्णालयात गेलं पाहिजे. त्याचवेळी दगडाचा मारा सुरू झाला, पोलीस पटापट जमिनीवर पडले. ७० पोलीस काय पाय घसरून पडले का? कोणी मारलं त्यांना रूग्णालयात रेकॉर्ड आहे. इतकंच नाही, तर या राज्यात महिला आयोगाच्या चाकणकर असतील आणखी कोण असेल. त्यांना इकडे यावं आम्ही त्या महिला पोलिसांच्या घरते पत्ते तुम्हाला देतो. त्यांची काय परिस्थिती झाली ती त्यांना विचारा, त्या सांगतील तुम्हाला, असंही भुजबळ पुढे म्हणालेत.

Jalna OBC Sabha
Jalna OBC Sabha: 'ते 70 पोलीस काय पाय घसरून पडले का?', अंतरवलीतील लाठीचार्जवर काय म्हणाले छगन भुजबळ?

'छत्रपती शिवाजी महाराजांनी मोघलांच्या सूनांना देखील आई म्हणून परत पाठवलं आणि तुम्ही आमच्या पोलिसांच्या अंगावर गेलात. लाज कशी नाही वाटली तुम्हाला. हे सर्व झाल्यानंतर म्हणाले की, पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांची बाजू आलीच नाही, एकच आले पोलिसांनी हल्ला केला' असंही पुढे भुजबळ म्हणाले.(Latest Maharashtra News)

'उपोषण केले, पोलिसांचा लाठीचार्ज झाला. तो लाठीचार्ज सगळयांनी पहिला. फक्त 70 पोलीस कर्मचारी होते तिथे तेव्हा दगडाचा मारा सुरु झाला. 70 पोलीस काय पाय घसरून पडले का?शिवाजी महाराजांनी मोघलांच्या सुनेला परत पाठवले पण यांनी काय केले तर महिला पोलिसांवर दगडफेक केली.'

Jalna OBC Sabha
Jalna OBC Sabha: "स्वकष्टाचे खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही"; छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल

आमच्या राज्यकर्त्यांना काय सांगायचं, एक दिवस आलं, परत सगळं बंद झालं. पोलिसांची बाजू आलीच नाही. एकच बाजू आली की, पोलिसांनी लाठीचार्ज केला. महिला पोलिसांवर हल्ला झाला मग करायचं काय? लष्कर भी तुम्हारा, सरदार भी तुम्हाला है, तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है, इस दौर के फर्यादी जाए तो जाए कहाँ, अभी राज्य भी तुम्हारा और दरबार भी तुम्हारा हैं', असं छगन भुजबळ पुढे म्हणाले.

'लाठीचार्ज झाल्यानंतर हे शूर सरदार घरात जावून पळून झोपले. यांना हे अंबडचे आमचे मित्र टोपे साहेब, दुसरे आमचे मित्र रोहित पवार, त्यांना घरातून रात्री तीन वाजता घेऊन आले. म्हणाले, बस तिकडे शरद पवार येणार आहेत. पण यांनी शरद पवारांना हे नाही सांगितलं की, लाठीचार्ज का झाला? शरद पवारांना आम्ही आजही उत्कृष्ठ प्रशासक समजतो”, असं भुजबळ म्हणाले.

'मराठा तरुणांची आज सहानुभूती गेली नसती. एसपीची सुद्धा चूक आहे. त्यांनी सांगायला हवं होतं की, माझे पोलीस रस्त्यावर एवढे पडले असताना मी काय करायला हवं? मी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांना सांगितलं, तुम्ही गृहमंत्री आहात. तुमच्याकडे सगळी माहिती आहे. तुम्ही सांगायला पहिजे होतं की, माझ्या पोलिसांवर हल्ले झाले मी हे सहन करु शकत नाही. राज्याच्या देशाच्या पुढे हे खरं चित्र आलं नाही. उलट पोलिसांना सस्पेंड केलं. होम मिनिस्टरनेच माफी मागितली. गुन्हे मागे घेतो. किती लांगुलचालन करायचं? हिंमत वाढली. पोलीसही विचार करायला लागले. अरे आम्ही काही करायला गेलो तर आमच्यावर हल्ले. त्यामुळे जाऊद्या बीडमध्ये जे व्हायचंय ते होऊद्या, काय करतात ते करू दे,' असं भुजबळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com