Ajit Pawar: अमित शहांनी तिढा सोडवला? अजित दादांच्या मागण्या मान्य, शरद पवार गटाचा नेता सुद्धा मंत्री?

अमित शह यांच्यासोबतच्या बैठकीत नक्की काय घडलं
Ajit Pawar
Ajit PawarEsakal

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी काल बुधवारी (12 जुलै) रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याची माहीती आहे.  (Marathi Tajya Batmya)

तर या बैठकीमध्ये काय घडलं याच्या अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. कायदेशार लढाई लढण्यासंबधी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याची माहीती आहे. अजित पवार यांचं प्रकरण हरिष साळवे लढतील अशी माहिती आहे. तर शरद पवार यांच्या गटाकडून अभिषेक मनू सिंघवी लढतील अशी माहिती आहे. (Latest Marathi News)

या चर्चानंतर राज्याचं अर्थखातं राष्ट्रवादीकडे येईल अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तर खाते वाटपवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर आता दोन गट निर्माण झाले आहेत तर याबाबतची न्यायालयीन लढाई राष्ट्रवादीला लढावी लागणार आहे, यासंबधी चर्चा अमित शाह यांच्या बैठकीत झाल्याची माहिती आहे. (Marathi Tajya Batmya)

तर राज्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शपथ घेतल्यापासून त्यांना कोणती खाती मिळणार याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अर्थखात मिळण्याबाबत राष्ट्रवादी आग्रही असल्याची माहिती आहे. अजित पवार आणि अमित शाह यांच्या बैठकीत अजित पवार यांनी याबाबत चर्चा केली असून भाजप राष्ट्रवादीला अर्थखात देण्यास तयार आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आहे.(Latest Marathi News)

मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप याचा तिढा लवकरच सुटणार असल्याची चिन्हं आता दिसू लागली आहेत. तर भाजप हायकमांड आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे, तर अजित पवार यांच्या 90 मागण्यावर या बैठकीत अमित शाह यांच्यासोबत एकमत झाल्याची माहिती आहे. (Marathi Tajya Batmya)

अजित पवार यांच्या दिल्लीवारीनंतर आज मुख्यमंत्री शिंदे , फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक होणार आहे. खाते वाटप आणि पालकमंत्री याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाने अर्थ,ऊर्जा, जलसंपदा खात्याची आणि पुणे पालकमंत्रीची मागणी केल्याची माहिती आहे. हा तिढा आज सुटणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.(Latest Marathi News)

त्याचबरोबर आणखी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ती म्हणजे शरद पवार यांच्या गटातील आणखी एक महत्वाचा नेता मंत्रिमंडळात दिसू शकतो, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्याची चर्चा आहे. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com