विधानसभेत मोठा गोंधळ; भास्कर जाधवांनी सांगितली संपूर्ण घडामोड

विधानसभेत हमरीतुमरी आणि शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडला
Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. पण पहिल्याच दिवशी सभागृहात आक्षेपार्ह गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांवर वर्षभरासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. पण नक्की सभागृहात काय घडलं याची माहिती तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. (What happened to suspend BJP MLAs Statement made by Bhaskar Jadhav)

Bhaskar Jadhav
भाजपचे 12 आमदार वर्षभरासाठी निलंबित

जाधव म्हणाले, कोरोनामुळं आयोजित केलेल्या दोन दिवसीय अधिवेशनात सरकार आणि विरोधीपक्ष जास्तीत जास्त कसं काम करुन घेतंय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं याकडं लक्ष लागून राहिलं आहे. सभागृहात सरकारतर्फे छगन भुजबळ यांनी जो प्रस्ताव आणला त्यावर पहिल्यांदा मंत्र्यांनी बोलायला पाहिजे होतं. पण विरोधीपक्षांनी परवानगी मागितली आणि मी त्यांना परवानगी दिली. त्याचं बोलणं पूर्ण होईपर्यंत त्यांना कोणीही थांबवलं नाही. पण त्यानंतर भुजबळ यांनी आपलं म्हणणं मांडायला सुरुवात केली आणि ठराव मांडला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांचा ओबीसी आरक्षणबाबत जर हेतू एकच आहे तर तो एकमतानं मंजुर करायला हवा होता. पण काही लोकांना ओबीसींना आरक्षण मिळूच द्यायचं नाहीए. आपण म्हणू तेच खरं अशा पद्धतीची मांडणी होईल अशी ज्यांची अपेक्षा होती. त्यांना भुजबळांनी पुराव्यानिशी उत्तर दिल्यामुळं ते अस्वस्थ झाले त्यामुळे सभागृहात हा सर्व प्रकार घडला."

भाजपचे सर्व आमदार माझ्यावर तुटून पडले - जाधव

"सभागृहातला प्रकार सभागृहातच थांबवण्याची प्रथा आहे. नाराजी, ओरडणं, व्यत्ययं आणणं हे नेहमीचचं काम आहे. पण आज महाराष्ट्राच्या संस्कृतीला, परंपरेला आणि महाराष्ट्राच्या वैचारिक विचारसरणीला काळीमा फासण्याचं काम भाजपच्या आमदारांनी केलं. त्यानंतर मी सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी संपवलं. काही चुकलं असेल तर सत्ताधारी आणि विरोधीपक्ष अध्यक्षांच्या दालनात बसून काही मार्ग निघतो का ते पाहतात, यासाठी मी काम थांबवलं. पण मी अध्यक्षांच्या केबिनमध्ये आलो तेव्हा स्वतः विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, त्यांचे सर्व वरीष्ठ आमदार आणि नवनिर्वाचित आमदार हे सर्वजण माझ्या एकट्यावर तुटून पडले. मी वरिष्ठ नेत्यांना सांगत होतो की सभागृहातला विषय सभागृहातच संपतो सभागृहाच्या बाहेर तो व्यक्तीगत घ्यायचा नसतो. अशा प्रकारे हाणामाऱ्या करायच्या नसतात. भाजपच्या लोकांकडून चुकीचे शब्द गेल्याचं स्वतः फडणवीस यांनीही मान्य केलं आहे."

सुसंस्कृत असल्याचा टेंभा मिरवणाऱ्यांकडून अश्लाघ्य प्रकार

दरम्यान, मला शिविगाळ, अंगावर धावून येणं, माझ्या आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या गेल्या. असा अश्लाघ्य प्रकार आपण संस्कृत आहोत असा टेंभा मिरवणाऱ्या पक्षाच्या लोकांकडून घडला आणि त्याला त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी पाठिंबा दिला ही अत्यंत दुदैवी बाब होती, असं भास्कर जाधव यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com