

Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगचा एक व्हिडीओ मंगळवारी समोर आला. तपास यंत्रणांसाठी हा सर्वात मोठा पुरावा समजला जातोय. त्यामुळे वाल्मिक कराडचे पाय आणखीनच खोलात गेले आहेत. व्हिडीओ बाहेर आल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधून आजवर झालेल्या खुनांचा पाढा वाचला.