बाळासाहेब ठाकरे पुण्यात आले की त्यांची गाडी चालवायचे "अविनाश भोसले"

बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वरला अनेकदा अविनाश भोसले यांच्या बंगल्या मध्ये मुक्कामाला देखील राहिले आहे
why businessman avinash bhosle Bal Thackeray
why businessman avinash bhosle Bal Thackeraysakal

मुंबई आणि पुण्यात सध्या सीबीआयची छापेमारी सुरू असून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या मालमत्तांवर छापेमारी सुरू केली आहे. यापूर्वीही गेल्या वर्षी ईडीने कारवाई करत अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबाची जवळपास ४०.३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. अविनाश भोसले हे प्रसिद्ध बांधकाम तसंच हॉटेल व्यावसायिक आहेत. तसंच ते कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरेही आहेत. मुंबई आणि पुण्यात त्यांचा बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. पुण्यातच त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालयही आहे.

अविनाश भोसले यांचा जन्म संगमनेर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आहे. वडील निवृत्ती भोसले हे संगमनेर येथे सावर्जनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता होते. अविनाशला एक भाऊ-अभय आणि दोन बहिणी आहे. अविनाश भोसले यांचे वडील निवृत्ती गणपत भोसले हे मूळ कराड, सातारा येथील रहिवासी आहे. अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरतून पुण्याला आला. पुण्यात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसायला सुरुवात केले. त्यानंतर यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी झाले. बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्यांशी पण अविनाश भोसलेने ओळख करून घेतले. काही दिवसात अविनाश भोसले रस्तेची लहान-मोठी काम घेऊ लागले. पुढे त्यांने सासर्‍यांच्या माध्यमातून अधिक मोठी काम मिळायला लागली.

1995 ला राज्यात शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अविनाश भोसलेच नशीब खऱ्या अर्थाने उघडलं. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात ओलिताखाली आणण्यासाठी युती सरकारकडून कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. महामंडळाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांच्या कामांना सुरुवात झाली. तोपर्यंत जलसंपदा विभागातील काम करण्यासाठी आंध्र प्रदेशचे कंत्राटदार होती. यावेळे भोसले यांच्या या विभागातील प्रवेशानं एका मराठी कंत्राटदार म्हणुन पुढे आला. अविनाश भोसलेने सर्व पक्षीय राजकीय पक्षातील नेत्यांची जवळीक साधत होता. त्यानंतर त्यांची प्रगती सुसाट वेगानं सुरु झाली.

प्रवासात राजकीय नेत्यांची त्यांची असलेली जवळीक अनेकदा दिसून आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा पुण्यात यायचे तेव्हा अविनाश भोसले स्वतःची गाडी घेऊन बाळासाहेब ठाकरे आणायला जायचा. बाळासाहेब त्यांची गाडी चालवत होते. शिवाय बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वरला अनेकदा अविनाश भोसले यांच्या बंगल्या मध्ये मुक्कामाला देखील राहिले आहे. उद्धव ठाकरे यांनी आषाढी वारीला ज्या हेलिकॉप्टर चा उपयोग केला ते हेलिकॉप्टर देखील अविनाश भोसले यांच्या मालकीचं होत. उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी पाहावा विठ्ठल या त्यांच्या पुस्तकामध्ये अविनाश भोसले यांचे आभार देखील व्यक्त केले होते.

पुण्यातील बाणेर मध्ये अविनाश भोसलेने उभारलेलं व्हाईट हाऊस हे मध्यवर्ती केंद्र बनलं आहे. या व्हाईट हाऊसच्या टेरेसवर अविनाश भोसलेंच्या मालकीच तीन हेलिकॉप्टर उभे असतात. अवघ्या काही रिक्षांवरून ते स्वतःच्या मालकीचा हेलिकॉप्टर इथपर्यंतचा प्रवास हा अचंबित करणारा होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com