अन् एकाच मंडपात त्याने केले दोघींशी लग्न

Untitled-2.jpg
Untitled-2.jpg

(भिंड) मध्य प्रदेश :  एकाच नवरदेवाने एकाच मंडपात आपल्या बायकोसहीत आपल्या मेहुणीसोबत दोन लग्न केल्याचे केव्हा ऐकिवात नाही, पण मध्य प्रदेशातील भिंड या जिल्ह्यात असा प्रकार घडला आहे. या प्रकाराचीच सध्या सोशल मिडीयात चर्चा आहे.  

सध्या एकाच मंडपात पत्नी आणि तिच्या मामाच्या बहिणीसोबत लग्न करणाऱ्या नवरदेवाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होेतो आहे.  मात्र या फोटो मागची स्टोरी वेगळीच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्याहून 30 किलोमीटर लांब असलेल्या एका गावातील व्यक्तीनं एकाच वेळी, एकाच मंडपात पत्नी व मेहुणी सोबत लग्न केले आहे. दिलीप परिहार (35) व विनीता देवी (28) या दोघांचे 9 वर्षापूर्वी लग्न झाले होते. या दोघांना तीन मुलंही आहेत. असं असताना देखील गुदावली गावात 26 नोव्हेंबर रोजी दिलीप परिहारनं दुसरं लग्न केलं. दिलीपनं 22 वर्षाची मेहुणी रचना हिच्या सोबत लग्नाचे फेरे घेतले. त्यानंतर स्टेजवर त्याची पहिली पत्नी विनीता देवीलाही वरमाला घातली.

याच दरम्यान सर्व सोशल मिडीयाय सध्या या दोन बहिणींना एकाच मंडपात लग्न व वरमाळा घालतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्या दोघी वधूच्या वेशात आहे. त्या वरमाला घालून दिलीपच्या दोन्ही बाजूला उभ्या आहेत.

दरम्यान, लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर दिलीपनं सांगितले की, 9 वर्षापूर्वीच विनीता सोबत लग्न झालं होतं, विनीता सतत आजारी असते. त्यामुळे मुलांचा साभांळ कसा करणार अशी चिंता तिला होती. तिनेच मला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला. मुलांचा सांभाळ करू शकेल, अशीच व्यक्ती हवी असा आमच्या दोघांचं मत होतं. तेव्हा तिच्या मामाची मुलगी म्हणजे रचना मला आवडते, ती मुलांना जीव लावेल, असं मी तिला सांगितलं. तिचाही रचनावर विश्वास होता. म्हणून मामाच्या मुलीशी लग्न करण्यासाठी तिनेच मंजुरी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com