
Sujay Vikhe Exclusive Interview: अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय विखे यांना २०२४च्या खासदारकीच्या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निलेश लंके यांनी त्यांना धोबीपछाड दिली. पण यानंतर अहिल्यानगरच्या राजकारणात बरीच खळबळ पाहायला मिळाली.
दरम्यान, लंके आणि विखे यांच्यामध्ये निवडणुकीतील जय-पराजयावरुन चांगलीच खडागंजी अनुभवायला मिळाली. यापार्श्वभूमीवर सुजय विखे यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. राजकारणात विषय सोडून देणारा माणूस मूर्ख असतो असं त्यांनी म्हटलंय. तसंच मनाचा मोठेपणा वैगेरे असलं काही आपण मानत नाही, असंही म्हटलं. सरकारनामाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलं आहे.