Hindi Row: हिंदी भाषेच्या मुद्द्यावरुन राज्यात सध्या रान पेटलं आहे. त्यातच आता युवासेनेचे अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी एक खळबळजनक सवाल उपस्थित केला आहे. भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच हा हिंदी सक्तीचा जीआर काढला आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. फडणवीसांच्याविरोधात महायुतीच्या सरकारमध्ये काम सरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.