महाराष्ट्र कधी होणार पूर्ण अनलॉक? टास्क फोर्सच्या प्रमुखांची माहिती

राज्य पूर्णपणे अनलॉक होण्यामध्ये काय अडचणी आहेत? हे सविस्तर जाणून घ्या
Satara Unlock
Satara Unlockesakal

मुंबई : राज्य शंभर टक्के अनलॉक करण्याबाबत अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. पण हे अनलॉक कधीपर्यंत होईल याची माहिती कोविड टास्क फोर्सचे (Covid Task Force) प्रमुख डॉ. संजय ओक (Dr. Sanjay Oak) यांनी दिली आहे. कोरोनाचा संसर्ग सध्या नियंत्रणात आहे ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास मार्चनंतर महाराष्ट्र १०० टक्के अनलॉक (Maharashtra Unlock) करण्याचा निर्णय घेण्यात येईल, डॉ. ओक यांनी सांगितलं आहे. (When will Maharashtra be 100 percent unlocked Info provided by head of task force)

Satara Unlock
लग्नाचं ऑलिम्पिक! अख्खं गाव असतं वऱ्हाडी; सूट-बूट नाही, वर येतो अनवाणी

ब्रिटनमध्ये सध्या डेल्टाक्रॉन (Delta cron) हा नवा व्हेरियंट आढळून आल्यानं त्याचा प्रसार भारतापर्यंत होण्याची शक्यता लक्षात घेता, महाराष्ट्र अद्याप पूर्णपणे अनलॉक करण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अशाच एका व्हेरियंटनं अर्थात ओमिक्रॉननं (Omicron) जगाची चिंता वाढवली होती. या व्हेरियंटचा प्रसाराचा वेग अधिक असला तरी त्याची लक्षण तीव्र नसल्यानं आणि लसीकरण मोठ्या प्रमाणावर पार पडल्यानं याचा मोठा परिणाम जाणवला नव्हता.

Satara Unlock
TET परिक्षा घोटाळ्यासंबंधी मोठी बातमी; चौघा दलालांना अटक

कोविड टास्कफोर्सनं सध्या बऱ्यापैकी नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. तरी देखील सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणं अद्याप पूर्ण क्षमतेनं सुरु झालेली नाहीत. फेब्रुवारीपर्यंत मुंबईचं १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल, अशी अशा महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली होती. एकूणचं जास्तीत जास्त वेगानं लसीकरण होणं आणि कोरोनाचा संसर्ग कमी होत गेल्यास मुंबईसह राज्यात पूर्णपणे अनलॉक होऊ शकतं, असं सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com