

Tanaji Malusare’s 26 kg sword and Chhatrapati Shivaji Maharaj’s Kavadyachi Maal are preserved by the Malusare family in Mahad as part of their descendants’ legacy.
esakal
इतिहासाच्या पानांमध्ये अशा काही वीरगाथा कोरल्या गेल्या आहेत, ज्या आजही अंगावर शहारे आणतात. स्वतःच्या मुलाचं लग्न उंबरठ्यावर असताना हातातील अक्षता बाजूला सारून ज्यांनी रणांगणाचं निमंत्रण स्वीकारलं तो पराक्रम आजही सह्याद्रीच्या कड्याकड्यांत घुमतोय. "आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं" हा अजरामर शब्दोच्चार करत केवळ ३०० मावळ्यांच्या साथीने रात्रीच्या अंधारात काळजाचा थरकाप उडवणारा उभा कडा चढून ज्यांनी अशक्य कोटीतील विजय खेचून आणला त्या अजोड शौर्याने स्वराज्याचा पाया अधिक भक्कम केला.