Palestine Terrorism : आपल्या खेळाडूंच्या हत्येचा सूड उगवताना मोसादने एक चूक केली आणि त्यांचा सर्वात हुशार एजंट पकडला गेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Palestine Terrorism

Palestine Terrorism : आपल्या खेळाडूंच्या हत्येचा सूड उगवताना मोसादने एक चूक केली आणि त्यांचा सर्वात हुशार एजंट पकडला गेला

Palestine Terrorism : 1972 साली जर्मनीत ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जगभरातील सर्व खेळाडू स्पर्धेत भाग घेण्यासाठी जर्मनीला पोहोचले होते. या स्पर्धेसाठी इस्राईलचे 11 खेळाडू सुद्धा जर्मनीत पोहोचले. इस्राईल आणि पॅलेस्टाईन मधून तेव्हा विस्तव सुद्धा जात नव्हता. इस्त्रायली खेळाडू जर्मनीत आल्याची माहिती पॅलेस्टाईन दहशतवाद्यांना लागली होती.

हेही वाचा: Love Letter : तुम्ही महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाल; अभिजीत बिचुकलेंचं पत्र चर्चेत

त्यांचं अपहरण करायच्या हेतूने 5 सप्टेंबर 1972 रोजी जर्मनीच्या म्युनिक शहरात ब्लॅक सप्टेंबर आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना पोहोचली. त्यांनी या खेळाडूंचं अपहरण केलं आणि त्यांना बंदी बनवलं. यातल्या दोन खेळाडूंनी पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, त्यांना या दहशतवाद्यांनी मारलं.

हेही वाचा: Love Life : ब्रेकअप नंतर काही लोक यशस्वी का होतात?

तर उर्वरित खेळाडूंवरही गोळीबार करून त्यांची हत्या केली. पॅलेस्टाईन आणि इस्राईल मधील पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झालेला असतो. जेव्हा या घटनेचं वृत्त इस्राईलला पोहोचलं तेव्हा इस्रायलच्या लोकांमध्ये आक्रोश सुरु झाला. इस्रायलच्या तत्कालीन पंतप्रधानांनी मृत खेळाडूंचं घर गाठलं आणि कुटुंबाचं सांत्वन करताना आश्वासन दिलं की "ज्यांनी कुणी हे कृत्य केलेले आहे याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.

हेही वाचा: Women Health : प्रसूतीपश्चात नैराश्याचे वेळीच निदान न केल्यास होतात गंभीर परिणाम

लगेचच काही दिवसांनी इस्रायली सैन्याने पॅलेस्टाईनमधील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करायला सुरुवात केली. यात 200 हुन अधिक दहशतवादी मारले गेले. हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांबरोबरच कितीतरी सामान्य पॅलेस्टाईन नागरिक मारले गेले. इस्राईल एवढ्यावरच थांबलं नाही.असं कृत्य करण्याची पुढे कोणाचीही हिंमत होऊ नये यासाठी ज्या दहशतवाद्यांनी इस्राईलच्या खेळाडूंना मारलं होतं त्यांना शोधण्याची आणि त्यांना मारण्याची जबाबदारी इस्राईलच्या गुप्तचर संघटना मोसादला दिली गेली.

हेही वाचा: Mens Bracelets Fashion : मुलींमध्ये सर्वात जास्त चर्चा असलेले मेन्स ब्रेसलेट!

मोसादला दिलेल्या जबाबदारीनुसार पुढची काही वर्ष मोसादने जगाचा कानाकोपरा शोधून काढला. संबंधित दहशतवाद्यांना शोधून काढुन त्यांच्याच देशात त्यांना जीवानिशी मारलं. विशेष गोष्ट म्हणजे संबंधित दहशतवाद्यांना मारण्यापूर्वी मोसाद त्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना एक फुलांचा गुच्छ पाठवायची. त्यात एक चिट्ठी असायची. यात लिहिलेलं असायचं की, "आम्ही विसरत नाही आणि माफ तर कधीच करत नाही." अकरा खेळाडूंना मारल्याच्या बदल्यात संबंधित दहशतवाद्यांवर अकरा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

हेही वाचा: Heart And Covid-19 : कोरोना व्हॅक्सिन अन् हार्ट अटॅकचा काय संबंध? वाचा काय सांगतात रिपोर्ट्स

पण हे सगळं घडत असताना, मध्येच मोसादला आपलं ऑपरेशन थांबवावं लागलं होतं.इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने अली हसन सलामेहला म्युनिक ऑलिम्पिकचा मास्टरमाइंड मानला होता. मात्र, म्युनिकच्या घटनेनंतर अनेक वर्षे तो भूमिगत होता आणि वेगवेगळ्या देशात तो वेगवेगळ्या नावाने राहत होता. मग कळलं की तो नॉर्वेच्या कोणत्यातरी शहरात आहे. म्युनिक हत्याकांडानंतर फक्त एक महिना झाला होता आणि मोसादच्या ऑपरेशन रॅथ ऑफ गॉडने सुमारे चार संशयित आधीच मारले होते.

हेही वाचा: Heart Care : फिटनेस प्रेमींनो सावधान! प्री वर्कआऊट सप्लीमेंट ठरू शकतात हार्ट अ‍ॅटॅकच कारणं

आपले ऑपरेशन पूर्ण करण्याच्या आणि म्युनिक हल्ल्यातील गुन्हेगारांना मारण्याच्या घाईत, मोसादने चूक केली. अली हसन सलामेह नॉर्वेमध्ये असल्याची माहिती मोसादच्या एजंट्सना मिळाली. त्यांनी ही माहिती त्यांच्या टीमच्या प्रमुखाला दिली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पुढे केला असता तो नॉर्वेतील लिलेहॅमर इथं राहत असल्याचं समजलं. 21 जुलै 1973 रोजी, मोसाद एजंट्सनी नियोजनाप्रमाणे हल्ला केला. पण यात एका मोरोक्कन वेटर अहमद बोचिकीला आपला जीव गमवावा लागला.

हेही वाचा: Coffee Recipe : घरच्या घरी कशी तयार कराल कॅफे स्टाइल कॉफी ?

अली हसन सलामेह सुरक्षित होता. वेटर म्हणून काम करणारा अहमद बोचिकी निर्दोष होता, त्यानंतर नॉर्वेच्या पोलिसांनी मोसादच्या सहा एजंटना अटक केली. टीमचे प्रमुख माईक हरारी आणि इतर काही एजंट फरार झाले. या सहा एजंटमध्ये दोन महिला एजंट्सचाही समावेश होता. त्यापैकी एक सिल्विया राफेल होती. मोसादला वाटलंच नव्हतं की त्यांचा सर्वात हुशार एजंट पकडला जाईल. हे प्रकरण लिलहॅमर प्रकरण म्हणून प्रसिद्ध झालं. यात पकडलेल्या गेलेल्या मोसादच्या एजंट्सना साडेपाच वर्षांची शिक्षा झाली.