esakal | ‘पांढऱ्या सोन्या’ला अच्छे दिन!
sakal

बोलून बातमी शोधा

white cotton

पावसाने यंदा जूनमध्ये उशिरा सुरवात केली असली तरी, नंतर पावसाने मधले अंतर (गॅप) भरून काढत एकूण सरासरीच्या ७० टक्‍क्‍यांपर्यंत मजल मारली आहे. खानदेशातील ‘पांढरे सोने’ म्हणून कापसाला प्राधान्य दिले जात असून, यंदा या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर येणार आहे.

‘पांढऱ्या सोन्या’ला अच्छे दिन!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव - पावसाने यंदा जूनमध्ये उशिरा सुरवात केली असली तरी, नंतर पावसाने मधले अंतर (गॅप) भरून काढत एकूण सरासरीच्या ७० टक्‍क्‍यांपर्यंत मजल मारली आहे. खानदेशातील ‘पांढरे सोने’ म्हणून कापसाला प्राधान्य दिले जात असून, यंदा या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर येणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भावानुसार यंदा कापसाला ५२०० पर्यंत भाव मिळेल, असे व्यापारी सांगत आहेत. २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात सोळा लाख कापसाच्या गाठी तयार झाल्या होत्या. यंदा कापसाचे अधिक उत्पादन होणार असल्याने २० लाख गाठी तयार होतील, असे चित्र आहे.

खरिपात यंदा ५ लाख १ हजार ४३६ एवढा कपाशीचा पेरा झालेला आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे कपाशीची स्थिती उत्तम आहे. दोन महिन्यांत बोंडे परिपक्व होऊन कापूस काढणीवर येईल. गतवर्षी कापसाला बाजारपेठेत ५५०० ते ५६०० पर्यंत भाव मिळाला. यंदा मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भावाचा विचार करता मागील वर्षीचा भाव व्यापाऱ्यांना देणे परवडणार नाही. त्यामुळे यंदा कापसाला प्रतिक्विंटल ५२०० रुपयांपर्यंत भाव मिळेल, अशी आशा आहे.

loading image
go to top