

History of Nagpur's Bhosle Dynasty, descendants of Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
नागपूरचे भोसले घराणे हे मराठा साम्राज्यातील एक अत्यत देदीप्यमान आणि पराक्रमी घराणे म्हणून ओळखले जाते. या घराण्याचा इतिहास केवळ विदर्भापुरता मर्यादित नसून त्यांनी भारताच्या पूर्व किनारपट्टीपर्यंत मराठ्यांची सत्ता विस्तारली होती. ऐतिहासिक पुराव्यांनुसार आणि वंशावळीनुसार नागपूरचे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे हे एकाच मूळ पुरुष बाबाजी भोसले यांचे वंशज आहेत. बाबाजींचे पुत्र मालोजी राजे (शिवरायांचे आजोबा) आणि विठोजी राजे यांच्यापैकी विठोजी राजेंच्या शाखेतील हे नागपूरकर भोसले आहेत. त्यामुळे रक्ताच्या नात्याने हे छत्रपतींचे चुलत भाऊ लागतात. छत्रपती शाहू महाराजांनी रघूजी भोसले प्रथम यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून त्यांना सेनासाहेब सुभा ही पदवी दिली आणि पूर्व भारताची जबाबदारी सोपवली.
Nagpur Bhonsle dynasty of Nagpur Descendants today
esakal