
महाराष्ट्र विधानसभेच्या आवारात आज राजकीय प्रतिष्ठेला तडा गेला आहे. विधानभवनाच्या लॉबीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया पोस्टद्वारे वेगाने पसरत आहे. काल विधानभवनाबाहेर दोन्ही आमदार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक शिवीगाळ आणि वाद झाला. ज्याचे रूपांतर आज हाणामारीत झाले. या घटनेत नेमके कोण होते, हे आता समोर आले आहे.