who Builder Vicky Kukreja car Devendra Fadnavis On Samruddhi Mahamarg
who Builder Vicky Kukreja car Devendra Fadnavis On Samruddhi Mahamargesakal

Vicky Kukreja: उपमुख्यमंत्र्यांना गाडी देणारा बिल्डर विक्की कुकरेजा आहे तरी कोण ?

फडणवीसांनी चालवलेली गाडी बांधकाम व्यावसायिक विक्की कुकरजा यांची आहे.
Published on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ‘बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा’ पाहणी दौरा केला. दौऱ्यादरम्यान स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी चालवलेली गाडी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कारण ही गाडी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची नसून एका बिल्डरची होती. विक्की कुकरेजा असे त्या बिल्डरचे नावं आहे. तर बिल्डर विक्की कुकरेजा आहे तरी कोण ? जाणून घेऊया. (who Builder Vicky Kukreja car Devendra Fadnavis On Samruddhi Mahamarg)

समृद्धी महामार्गाची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यानंतर फडणवीस यांना गाडी दिलेले बिल्डर विक्की कुकरेजा यांचा भाजपशी काय संबंध या चर्चेला उधाण आलं आहे.

who Builder Vicky Kukreja car Devendra Fadnavis On Samruddhi Mahamarg
फडणवीसांनी चालवलेली 'ती' २ कोटींची गाडी बिल्डरची; काँग्रेसने सांगितलं गाडी मालकाचं नाव

कोण आहेत कुकरेजा ?

विक्की कुकरजा हे शहरातील बडे बांधकाम व्यावसायिक आहेत. भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. २०१७ मध्ये ते प्रथम भाजपकडून जरीपटका भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होते.

फडणवीस यांच्याशी घनिष्ठ मैत्री असल्यामुळे कुकरेजा यांना महापालिकेत अल्पकाळातच अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. आरोग्य समितीचे अध्यक्ष होते. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम सांभाळले आहे.

तसेच, २०१४ ते २०१९ या काळात बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांनी घेतलेली झेप अनेकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. मिहान मध्ये एम्स रूग्णालयापुढील प्रचंड मोठे निवासी व व्यावसायिक संकुल असो की सिव्हील लाईन्समधील प्रकल्प. नुकतीच त्यांनी सिव्हील लाईन्समधील अतिशय मोक्याच्या ठिकाणची एअर इंडियाच्या कार्यालयाची जागा त्यांनी लिलावात नुकतीच घेतली. असे अनेक प्रकल्प कुकरेजा समुहातील कंपनीच्या माध्यमातून सुरू आहेत.

हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

वादग्रस्त भोवऱ्यातही अडकले होते कुकरेजा?

एक यशस्वी उद्योजक, राजकारणी अशी ओळख कुकरेजा यांची असली तरी अनेक घटनांमध्ये ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. महिलांना मारहाणीचा, उत्तर नागपुरातील उद्यानासाठी राखीव जागा हडपन्याच्या आरोपांचा यात समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com