'लिलावती'च्या MRI रुममधील फोटो कोणी केले व्हायरल?; राजेश टोपेंनी दिला इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rajesh tope

'लिलावती'च्या MRI रुममधील फोटो कोणी केले व्हायरल?; राजेश टोपेंचा इशारा

मुंबई : खासदार नवनीत राणा यांना स्पॉंडिलायसिसचा त्रास असल्यानं लिलावती हॉस्पिटलमध्ये त्यांची एमआरआय चाचणी करण्यात आली. पण एमआरआय करतानाचे रुममधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं यावर टीका-टिपण्णी सुरु झाली आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावर भाष्य करताना MRI रुममधील फोटो राणांनी की रुग्णालयानं केले व्हायरल हे तपासण्यात येणार असून त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. (Who does viral photo of MRI room of Lilavati hospital Rajesh Tope gave warning)

टोपे म्हणाले, आम्ही लिलावती हॉस्पिटलशी बोलणार आहोत आणि हे फोटो राणा दाम्पत्यानं व्हायरल केले की लिलावती हॉस्पिटलने व्हायरल केले याची निश्चिती करणार आहोत. त्यानंतर कार्यवाहीबाबत आम्ही यावर योग्य तो निर्णय घेऊ.

हेही वाचा: राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी; राज्य पेटवण्याचा मनसेचा इशारा

हॉस्पिटलमध्ये फोटो काढणे हा नियमांचा भंग नाही. पण फोटो काढणे, ते व्हायरल करणे आणि त्यावर राजकारण करणं हे योग्य नाही. हे फोटो कुणी काढले आणि ते कुणी व्हायरल केले याचा आम्ही तपास करणार आहोत.

हेही वाचा: भारतानं श्रीलंकेत सैन्य पाठवले? भारतीय उच्चायुक्तालयाचं स्पष्टीकरण

दरम्यान, तुरुंगातून जामीनावर बाहेर आल्यानंतर नवनीत राणा यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांना स्पॉंडिलायसिसचा आजार असल्यानं त्यांचा एमआरआय स्कॅनही करण्यात आला होता. पण स्कॅनिंग मशीनमध्ये नेत असतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर टीका-टिप्पणी सुरु झाली होती.

Web Title: Who Does Viral Photo Of Mri Room Of Lilavati Hospital Rajesh Tope Gave Warning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top