पक्ष सोडून गेलेले पुन्हा येवू का... येवू का... असं विचारत आहेत- अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

पक्ष सोडून गेलेले पुन्हा येवू का... येवू का... असं विचारत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. पक्षाच्या पराभूत उमेदवारांना संबोधित करताना अपयशाने खचून न जाता, नव्या उमेदीने येणाऱ्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

मुबई : पक्ष सोडून गेलेले पुन्हा येवू का... येवू का... असं विचारत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. पक्षाच्या पराभूत उमेदवारांना संबोधित करताना अपयशाने खचून न जाता, नव्या उमेदीने येणाऱ्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

सर्वांनी कडवी झुंज दिली. मात्र जय-पराजय हा सन्मानजनक असावा तो राष्ट्रवादीचा सन्मानजनक विजय झाला आहे असेही पवार म्हणाले. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र पिंजून काढला त्याबद्दल अजित पवार यांनी त्यांचे आभार मानले. काही जिल्हयांनी ताकद दिली तर काही जिल्हयांनी ताकद दिली नाही त्यामुळे त्या जिल्ह्यात पराभव पत्करावा लागला असल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्या-ज्या जिल्हयात परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी आम्ही दौरा सुरु करत आहोत. लोकांच्या मागे धावून जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. पाच जिल्हयात जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत असून तिथे बांधणी आतापासूनच करायला लागा असे अजित पवार यांनी सांगितले.

तुमच्या मनात संभ्रमावस्था असेल तर तुम्हाला लोकांनी का मतदान करावे असा सवाल करतानाच शरद पवार साहेब महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आणि तुम्ही असं वागलात तर कसं होईल, तुम्हाला पक्षाने संधी दिली आहे. पक्ष वाढवा. मागे हटू नका. त्या त्या जिल्ह्यात समीकरणे जुळवली जातील असे आवाहनही अजितदादा पवार यांनी केले.

बारामतीत मला का लीड मिळते. याची माहिती घेण्यासाठी तुम्ही बारामतीत एकदा तरी या असा सल्लाही अजित पवार यांनी दिला. विविध आयुधांचा वापर करून विधानसभेत आणि लोकसभेत सरकारला नक्कीच सळो की पळो करुन सोडणार आहोत असेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले. पराभूत झालेले लोक विधानपरिषदेवर घ्या असं सांगायला येतील. त्यांनी त्या स्वप्नात राहू नका. अच्छे दिन येतील या भ्रमातही राहू नका असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who have left the party he wnat come again says Ajit Pawar