

Who is Bhagirath Biyani: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन दिवसीय मंथन शिबिर कर्जत येथे पार पडले. या शिबिरातून अजित पावारांसह सर्व नेत्यांनी शरद पवार गट आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. धनंजय मुंडे यांनी आव्हाड यांच्यावर खोचक टीका केली. खरी राष्ट्रवादी ठाण्यातून फोडण्यात आली, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. यावर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत मुंडेंवर आक्रमक पलटवार केला.
जितेंद्र आव्हाड यांनी बीडचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांच्या आत्महत्येचा प्रश्न उपस्थित केला. भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली? त्याच्या पोरीला कोणी छेडलं. अत्याचाराला कंटाळून भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केली की नाही?, असे अनेक प्रश्न धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत.
आता परळीमध्ये मुंडे नावाचा मुलगा मारला गेला. गुन्हा का नाही नोंदवला. मी कधीच काही बोललो नाही, मात्र माझं नाव घ्याल तर मी शांत बसणार नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांना दिला. (Who is Bhagirath Biyani)
कोण आहेत भगीरथ बियाणी ?
भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी (वय ४५) यांनी घरी रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. ही घटना ११ ऑक्टोंबर २०२२ मध्ये घडली होती. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. (Latest Marathi News)
मात्र या घटनेने राजकीय, सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली होती. भगीरथ गंगाभीषण बियाणी हे अनेक वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत होते. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा मोठा वावर होता. ११ तारखेला सकाळी ते मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. मात्र, मळमळ होत असल्याने ते वाटेतून परतले. घरातील खोलीत ते आराम करत होते, असे त्यांचे धाकटे बंधू प्रवीण बियाणी यांनी सांगितले होते. (Who is Bhagirath Biyani)
याच दरम्यान त्यांनी स्वत:च्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली होती. गोळीबाराच्या आवाजाने कुटुंबीयांनी धाव घेत खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी भगीरथ बियाणी यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे आढळले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.