Salim Kutta: ठाकरे गटाच्या नेत्यासोबत दिसलेला गँगस्टर सलिम कुत्ता कोण? त्याला 'कुत्ता' ही ओळख कशी पडली?

सलीम कुत्ता हा १९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी आहे.
Salim Kutta
Salim Kutta

Salim Kutta : मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला सलीम कुत्ता हा गँगस्टर सध्या चर्चेत आला आहे. कारण शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नाशिकचे शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा एक पार्टीतला व्हिडिओ समोर आला आहे.

यामध्ये बडगुजर हे सलीम कुत्ता सोबत डान्स करताना दिसत आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत या दोघांचा फोटो दाखवल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. (Who is gangster Salim Kutta What is the story behind his identity name like dog)

Salim Kutta
Lalit Patil: "फडणवीस शांतपणे अत्यंत खोट बोलत आहेत"; ललित पाटील प्रकरणावरुन अंधारेंचा आरोप

सलिम कुत्ता आहे कोण?

आजच्या सर्व राजकीय चर्चेत यापूर्वी कधीही जास्त चर्चेत नसलेला सलिम कुत्ता कोण आहे? याची चर्चा सुरु झाली आहे. तर सलिम मीरा शेख उर्फ सलीम कुत्ता हा गँगस्टर मोहम्मद डोसा याला मदत करत होता. मुंबईत अनेक स्मगलिंगच्या प्रकरणात त्याचा हात आहे. तसेच पायधनी आणि डोंगरी भागात विविध दंगली आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या दंगलीतही त्याचा सहभाग असल्याचं त्यानं मान्य केलं आहे.

Salim Kutta
Aaditya Thackeray : ''मी ठाण्यातून निवडणूक लढवतो...'' आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना थेट आव्हान

दंगलीबाबत दिला होता कबुलीजबाब

डीएनएच्या वृत्तानुसार, १९९३ च्या दंगलीबाबत त्यानं पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीजबाबात म्हटलं होतं की, मोहम्मद डोसा हा एक कुख्यात तस्कर असून त्यानं माझ्या आईच्या वैद्यकीय खर्चासाठी मला आर्थिक मदत करण्याचं तसेच मला क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये मला जामीन देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळं मी त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचा आणि त्याच्या तस्करीच्या धंद्यात त्याला मदत करण्याची शपथ घेतली. (Latest Marathi News)

जानेवारी दिघी आणि शेखाडी इथं शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पोहोचवण्यात माझा सहभाग होता. मुंबईत शस्त्रास्त्रांचा सुरळीत प्रवेश व्हावा यासाठी काही कस्टम्स आणि पोलीस अधिकाऱ्यांना डोसानं लाच दिली होती तेव्हा मी तिथं उपस्थित होतो.

Salim Kutta
मी आणि सलिम कुत्ता एकाच तुरुंगात होतो, पण...; सुधाकर बडगुजरांनी आरोपांवर दिले उत्तर

इतर देशात केला प्रवास

नंतर दाऊदनं आम्हाला बाबरी मशीद पाडल्याचा निषेध करणारं लेक्चर दिलं आणि आम्हाला हिंदूंविरुद्ध बंड करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानं आम्हाला बदला घेण्यासाठी तयार होण्यास सांगितलं. बॉम्बस्फोटानंतर मला कळलं की, पोलीस माझ्या मागवर आहेत. त्यामुळं मी मुंबई सोडून दिल्ली, उत्तर प्रदेश आणि भारताच्या ‘शेजारी देशात’ राहिलो. (Marathi Tajya Batmya)

Salim Kutta
AI Krutrim : ओलाच्या सीईओंनी लाँच केलं भारताचं पहिलं एआय प्लॅटफॉर्म 'कृत्रिम'; मिळणार 22 स्थानिक भाषांचा सपोर्ट

'कुत्ता' या ओळखीमागचा किस्सा काय?

सलीम शेख हा अंडरवर्ल्डमधील अत्यंत निर्दयी गँगस्टर होता. म्हणून या क्षेत्रात त्याची ओळख एखाद्या रानटी कुत्रा अशी पडली होती. त्यावरुन त्याला सलीम कुत्ता या नावानं ओळखलं जाऊ लागलं.

दरम्यान, 1993च्या मुंबईतील बॉम्बस्फोटात वापरली गेलेली शस्त्रे आणि दारूगोळा वाटपाच्या कटात भाग घेतल्याबद्दल सलीम कुत्ताला दोषी ठरविण्यात आलं होतं. टाडा कोर्टानं, सलिमच्या विनंतीवरुन कोर्टाच्या रेकॉर्डमधून 'कुत्ता' हे आक्षेपार्ह नाव वगळण्याचं मान्य केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com