

CA Lalit Pophale Turns Complainant in Kharat Case Allegations of Funds Sent Abroad Surface
Esakal
अशोक खरात प्रकरणाला आता नवं वळण लागण्याची शक्यता आहे. महिला अत्याचाराच्या आरोपानंतर आता आर्थिक गैरव्यवहाराचेही गंभीर आरोप होत आहेत. यात काही व्यवहार हे संशयास्पद असून हवालाच्या माध्यमातून खरातने शेकडो कोटी परदेशात पाठवल्याचा आरोप केला जात आहे. खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या आर्थिक संशयास्पद व्यवहारांवर पोलिस तपास करत असून, 2018 मध्ये केवळ चार लाखांची उलाढाल असलेल्या या ट्रस्टने 2024 पर्यंत कोटींच्या घरात झेप घेतल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. CA Lalit Pophale Turns Complainant in Kharat Case Allegations of Funds Sent Abroad Surface