शिवसेना गटनेत्याची जागा घेणारे अजय चौधरी कोण आहेत? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना गटनेत्याची जागा घेणारे अजय चौधरी कोण आहेत?

शिवसेना गटनेत्याची जागा घेणारे अजय चौधरी कोण आहेत?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या (MLC election) निकालानंतर शिवसेनेत (Shiv Sena) फूट पडल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. दरम्यान त्यांच्या या भूमिकेनंतर गटनेते पदावरुन एकनाथ शिंदेंना हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे.

अजय चौधरी हे शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. २०१९ मध्ये विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी ४० हजार मताधिक्क्याने विजयी झाले होते. त्यांनी मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा दारुण पराभव केला होता. चौधरी हे परळ येथे वास्तव्यास आहेत.

अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांच्या माध्यमातून पक्षावर ठाकरे कुटुंबाचीच मांड कायम राहावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.

2014 साली शिवसेनेतून विधानसभेवर निवडून गेले. 2015 मध्ये शिवसेने त्यांच्याकडे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पद दिले. 2019 साली शिवसेनेने त्यांना पुन्हा एकदा तिकीट दिले. 2019 साली विधानसभेवर निवडून आले.

शिवसेनेच्या गटनेतपदावरून शिंदे यांना डच्चू देण्यात आला आहे. त्याऐवजी अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, शिवसेनेने याबाबतची अधिकृत घोषणा केली नाही. या आधी गटनेतेपदी आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्याची चर्चा सुरू होती. मात्र, अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांची आमदार म्हणून दुसरी टर्म आहे. त्यामुळे त्यांच्याकडे गटनेतेपदाची ही धुरा देण्यात आली आहे.

टॅग्स :Shiv Sena