
बऱ्याच काळापासून राऊत कुटुंबावर ईडी नजर ठेऊन आहे. पत्राचाळ प्रकरणात सध्या राऊतांची त्यांच्या भांडूपमधल्या मैत्री या घरी चौकशी सुरू आहे. सध्या संजय राऊत, त्यांच्या पत्नी वर्षा आणि बंधू सुनील यांच्यासह ही चौकशी सुरू आहे. राज्यसभेचे खासदार आणि कट्टर शिवसेनावादी संजय राऊत राजकारणाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय वक्तव्यांमुळे कायम मीडियामध्ये आणि जनतेमध्ये हायलाईट असतात. तर दुसरीकडे मोठ्या भावाचा आदर्श घेत राजकारणात उतरलेल्या सुनील राऊतांचा माध्यमांशी पुरेसा संवाद नसतो. त्यांना माध्यमांशी फार कमी वेळा बोलताना बघितले जाते. संजय राऊतांसोबत आज चौकशी करण्यात आलेले त्यांचे भाऊ सुनील राऊत यांचाही चांगला राजकीय इतिहास आहे. (Who is sunil raut who was in sajay raut home during ED investigation)
मागील काळात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकारणात बऱ्याच चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच संजय राऊत यांचे धाकटे भाऊ सुनील राऊत शिंदे गटात सामील होणार असल्याचा दावा केला जात होता. मात्र संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील भाष्यात त्यांनी हा दावा फेटाळून लावला होता. या पत्रकार परिषदेत सुनील राऊतही हजर होते.
याशिवाय सुनील राऊत यांनी राजकारणात खालील पदे भूषवली आहेत
२०१४ - या वर्षात सुनील राऊत महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडून आले.
२०१५ - या वर्षात सुनील राऊत मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवडून आले.
२०१९ - परत एकदा महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडून आले.
२०२१ - या वर्षात मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची फेरनिवड झाली.
२०१९ मध्ये सुनील राऊतांना मंत्रीपद न मिळाल्यानं ते नाराज असल्याच्या अफवा उडाल्या होत्या. तसेच सुनील राऊत हे संजय राऊत यांचे भाऊ असल्याने त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता होती. मात्र, त्यांचं नाव मंत्रिमंडळाच्या यादीत न आल्याने त्यांचे मोठे बंधू संजय राऊत नाराज असल्याची चर्चा सुरू रंगली होती. मात्र यावर त्यावेळी संजय राऊत आणि सुनील राऊत स्पष्टच बोलले होते. 'तीन पक्षांत सरकार असल्यानं वाट्याला मंत्रीपदं कमी आलीत. मात्र यावर आम्ही नाराज नाही. आम्ही मागणारे नसून आम्ही पक्षाला देणाऱ्या लोकांपैकी आहोत.' असंही यावेळी राऊत बंधू म्हणाले होते.
आता पत्रा चाळ प्रकरणामध्ये संजय राऊतांसोबत तेसुद्धा ईडीच्या रडारवर असून त्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. संजय राऊतांना ईडीने आज ताब्यात घेतलं असून राऊत कुटुंबाचा पुढील तपास कसा होणार याकेड लक्ष लागलेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.