Maharashtra Karnataka Border: सीमा प्रश्नाची खपली काढणारे बसवराज बोम्मई कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Karnataka Border

Maharashtra Karnataka Border: सीमा प्रश्नाची खपली काढणारे बसवराज बोम्मई कोण?

सांगलीच्या जत तालुक्यातील काही गावांवर कर्नाटक सरकार दावा सांगण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं सीमाप्रश्न नव्याने पेटणार अशी चर्चा रंगली आहे. (who Karnataka Cm Basavaraj Bommai Maharashtra Karnataka Border Jat Sangli )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील बैठकीनंतर महाराष्ट्रासमोर नवं संकट उभं राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लवकरच भेट घेणार आहेत.

तर, महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नाची खपली काढणारे बसवराज बोम्मई कोण आहेत हे जाणून घेऊया. 2008 मध्ये भाजपात आलेल्या बोम्मईंनी 13 वर्षांत मोठी प्रगती करत मुख्यमंत्री पद गाठले आहे. बोम्मई यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे.

हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

कोण आहेत बसवराज बोम्मई ?

बसवराज बोम्मई यांचा जन्म 28 जानेवारी 1960 मध्ये झाला. बोम्मई हे भाजपाचे नाहीत तर जनता दलाचे. त्यांचे वडील एसआर बोम्मई कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. जनता दलातून बसवराज यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली.

बोम्मई हे लिंगायत समाजाचे नेते आहेत. ते काही काळातच येडीयुराप्पांचे खास बनले. बसवराज बोम्मई यांनी 2008 मध्ये भाजपात प्रवेश केला. तेव्हापासून त्याना मागे वळून पहावे लागले नाही. येडीयुराप्पांच्या काळात ते मंत्री होते.

बोम्मई हे मॅकेनिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात टाटा समुहातून केली होती. दोन वेळा विधान परिषदेवर आणि तीन वेळा आमदार म्हणून ते निवडून गेले आहेत.

भाजपमध्ये जाण्याआधी त्यांनी एचडी देवेगौडा आणि रामकृष्ण हेगडेंसोबत काम केले आहे. 1998 आणि 2004 मध्ये ते धारवाडमधून विधानपरिषदेचे आमदार होते. जनता दल युनायटेड सोडल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.

टॅग्स :Maharashtra Politics