
ठाणे : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना गद्दार असं संबोधणारे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्यावर आमदार संजय शिरसाट यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं. ज्यांचं घरात बायको ऐकत नाही ते अंबादास दानवे आज आम्हाला शिकवत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच घरात एक आणि आमदार झाल्यावर दुसरी अशा शब्दांत शिरसाट यांनी दानवेंवर घणाघाती टीका केली. (Whose wife do not listen at home they teaching us Sanjay Shirsat criticism Ambadas Danave)
गद्दार आहेत पुढच्या वेळी कसे निवडून येतात पाहू, असं आम्हाला जे म्हणतात त्यांचं घरात बायको ऐकत नाही. अंबादास दानवेंनी आज एक पोस्ट केली, त्यात त्यांनी म्हटलं की संजय शिरसाटांचं कुटुंब म्हणजे शिवसेना आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पायाशी चालले आहेत. पण अंबादास दानवेंच कुटुंब म्हणजे घरात एक आणि आमदार झाल्यावर शपथ घ्यायला दुसरी. दानवे महाराष्ट्राच्या विरोधीपक्षाचं स्वप्न पाहताय, अशा शब्दांत शिरसाट यांनी अंबादास दानवेंवर टीकास्त्र सोडलं.
मी एकमेव आमदार ज्यांला ७५ कोटी निधी दिला
एकनाथ शिंदेंनी मतदारसंघातील नागरिकांसाठी निधी द्यायला कधी मागेपुढे पाहिलं नाही. मी एकमेव आमदार आहे ज्यांना त्यांनी सुमारे ७५ कोटी रुपये दिले. नाहीतर दुसरे आपले पालकमंत्री होते त्यांना जय महाराष्ट्र म्हटलं तरी त्यांनी कधी आमच्याकडं पाहिलंच नाही. आमच्या मंत्र्याच्या माणसांनी आमच्याकडे दहा टक्क्यांनी पैसे मागितल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवसेनाचा उमेदवार पडला तर बाळासाहेब अस्वस्थ व्हायचे
शिवसेनेत आधी एक उमेदवार निवडणुकीत पडला तर बाळासाहेब ठाकरे अस्वस्थ व्हायचे. पण आता एकजण उठतो आणि रोज शरद पवारांचे गुण गातोय. उद्धव ठाकरेंनी आपल्या बाजुला बसलेल्या अशा लोकांना हाकलून लावावं. कारण असले लोक आता आम्हाला शिवसेना शिकवतात. ज्या राष्ट्रवादीनं आपल्याला संपवण्याचं काम केलंय. आजही त्यांना वाटतंय की राष्ट्रवादीच आपल्याला तारणार आहे, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.