
जवळपास २० वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मंचावर दिसले. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही भावांचे एकत्र येणे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. त्यांनी मराठी विजय रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी दोन्ही बंधूंनी जोरदार भाषण केले आहे. यानंतर आता राजकारणात अनेक प्रतिक्रिया येत आहे. यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणविसांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र त्यांनी ही प्रतिक्रिया देताना सावध भूमिका ठेवली आहे. मात्र ती राज ठाकरेंच्या बाजूने... तसेच दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. यावरून आता राजकारणात नेमके काय शिजत आहे? यामागचे कारण काय?, असे प्रश्न समोर आले आहेत. मात्र यामागचे खरे समीकरण काही वेगळेच आहे.